शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना कोणाची? ठाकरे-शिंदे गट एवढ्या मतदारसंघांत थेट भिडणार; कुठे कुठे लढाई ठरली...
2
मोठा खेळ झाला! माजी आमदार एक मिनिट लेट झाले, निवडणुकीचा अर्ज भरण्यास मुकले
3
अजित पवार गटाच्या बंडखोरीविरोधात शिंदेंची खेळी, या उमेदवारांना थेट हेलिकॉप्टरने पाठवले ए-बी फॉर्म
4
एका दिवसात ६६,९२,५३५% रिटर्न, 'हा' बनला भारतीय बाजारातील सर्वात महागडा स्टॉक; MRF ला टाकलं मागे
5
"...तेव्हा आपोआप हिंदू-मुस्लीम एक्य होईल!"; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांनी CM योगींना सांगितला फॉर्मूला
6
Narak Chaturdashi 2024: नरक चतुर्दशीला सूर्योदयापूर्वी स्नान करा, नाहीतर नरकात जावे लागेल; वाचा महत्त्व!
7
"२ कोटी द्या अन्यथा..."; सलमान खानला पुन्हा धमकी! अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
8
दिवसभर नॉट रिचेबल असलेले श्रीनिवास वनगा रात्री उशिरा घरी परतले, पण...
9
राज्यात तब्बल ७,९९५ उमेदवार, सर्वच पक्षांत बंडखोरही भारंभार, १०,९०५ उमेदवारी अर्ज दाखल
10
धनत्रयोदशीला भारतीयांची जोरदार खरेदी; ₹२०००० कोटींचं सोनं, ₹२५०० कोटींच्या चांदीची विक्री
11
IND vs NZ: मुंबईत गेली १२ वर्ष भारत अजिंक्य! शेवटचा विजय न्यूझीलंडविरूद्धच... पाहा आकडेवारी
12
अजित दादांचा आरोप, आर आर पाटलांची सही, माझा बळी अन्...; पृथ्वीराज चव्हाण यांनी सगळंच सांगितलं!
13
Stock Market: मंगळवारच्या तेजीनंतर शेअर बाजाराची आज घसरणीसह सुरुवात, Sensex ३०० अंकांनी आपटला
14
"हा निर्णय कठीण होता, पण...", सई ताम्हणकरने अनिश जोगसोबत ब्रेकअप झाल्याची दिली कबुली
15
घर फोडायचे पाप आई-वडिलांनी शिकवले नाही; शरद पवार यांची अजित पवार यांच्यावर टीका
16
मुलांच्या भविष्याची चिंता आहे तर, या फॉर्म्युलानं सुरू करा गुंतवणूक; १८ व्या वर्षी मूल बनेल कोट्यधीश
17
आजचे राशीभविष्य: ७ राशींना आनंदी दिवस, लाभाचे योग; कार्यात यश, चांगली बातमी मिळेल
18
वडेट्टीवार, मुनगंटीवार, धानोरकरांची प्रतिष्ठा; महायुती व महाविकास आघाडीत लढत
19
शुक्रवारी लक्ष्मीपूजन: ८ राशींना अनुकूल, धनलाभाचे योग; धनलक्ष्मी प्रसन्न होईल, वरदान काळ!
20
पोलिस-वकिलांमध्ये कोर्टातच हाणामारी; ११ वकील जखमी, पोलिस ठाण्याला आग

सामान्यांच्या अपेक्षांना उत्तरदायी सेवेचा हा सन्मान- विनय कुमार चौबे

By नारायण बडगुजर | Published: August 14, 2023 9:04 PM

या उत्कृष्ट सेवेची दखल घेत पोलिस दलासाठीचे सर्वोच्च बहुमानाचे राष्ट्रपती पदक प्राप्त झाले, अशा भावना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या....

पिंपरी : भारतीय पोलिस प्रशासकीय सेवेमध्ये काम करण्याची इच्छा होती. त्यामुळे आयआयटी करूनही ‘आयपीएस’ झालो. सामान्यांच्या अपेक्षा आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन यांची सांगड घालून जबाबदार, उत्तरदायी पोलिसिंग केले. त्यामुळे प्रत्येक जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता आली. या उत्कृष्ट सेवेची दखल घेत पोलिस दलासाठीचे सर्वोच्च बहुमानाचे राष्ट्रपती पदक प्राप्त झाले, अशा भावना पिंपरी-चिंचवडचे पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केल्या.

पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाचा वर्धापन दिन आणि स्वातंत्र्य दिनाच्या पूर्वसंध्येला विनय कुमार चौबे यांना उल्लेखनीय, उत्कृष्ट सेवेबद्दल विशिष्ट राष्ट्रपती पदक जाहीर झाले. त्यामुळे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. पोलिस यंत्रणा जबाबदार, उत्तरदायी तसेच सज्ज असावी, त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडाव्यात अशी भूमिका आहे. त्यानुसार त्यांनी पोलिस दलातील त्यांच्या प्रदीर्घ २६ वर्षांच्या सेवाकाळात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न केला. या उत्कृष्ट सेवेची दखल घेत आयुक्त चौबे यांना यापूर्वीही वेळोवेळी सन्मानित केले आहे. पदक जाहीर झाल्यानिमित्त त्यांच्याशी साधलेला हा संवाद.

विनय कुमार चौबे म्हणाले, मी महाराष्ट्र केडरच्या १९९५ च्या बॅचमध्ये भारतीय पोलिस सेवेत (आयपीएस) दाखल झालो. कानपूर आयआयटीमधून अपारंपरिक ऊर्जा संसाधनांमध्ये मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी, तसेच मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजीची पदवी घेतली. रत्नागिरी, अकोला आणि सोलापूर (ग्रामीण) जिल्ह्यांचे पोलिस अधीक्षक म्हणून काम केले. राज्यपालांचे एडीसी म्हणूनही काम केले. तसेच मुंबईत पश्चिम उपनगरचे पोलिस उपायुक्त म्हणून देखील जबाबदारी सांभाळली. त्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने २००९ मध्ये पोलिस उपमहानिरीक्षक म्हणून पदोन्नती दिली. त्यानंतर राज्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणी काम करत जातीय हिंसाचार आणि गंभीर गुन्ह्यांची परिस्थिती यशस्वीपणे हाताळली. त्याची दखल घेत २०१२ मध्ये पोलिस पदक आणि २०१० मध्ये पोलिस महासंचालकांच्या मानचिन्हाने सन्मानित केले होते.

‘पासपोर्ट प्रक्रिया पेपरलेस केली’

केनेसॉ राज्य विद्यापीठ येथून २०१६ मध्ये सायबर सुरक्षा आणि गतिशीलता अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. तसेच सायबर कायद्याचा अभ्यासक्रमही पूर्ण केला. परराष्ट्र मंत्रालयात मुंबई येथे प्रादेशिक पासपोर्ट अधिकारी, म्हणून काम करत असताना पेपरलेस कामकाज करून पूर्ण प्रक्रिया ऑनलाइन केली. पासपोर्ट प्रक्रियेच्या क्रांतीकारक बदलांसाठी नियुक्त केलेल्या समितीत महत्त्वाचा घटक म्हणून जबाबदारी पार पाडली. नेदरलँड येथील भारतीय दूतावासाच्या भारतीय सांस्कृतिक केंद्रांतर्गत असलेल्या गांधी केंद्राचे समुपदेशक/संचालक म्हणून देखील काम पाहिले, असेही चौबे यांनी सांगितले.

‘घोटाळे उघडकीस आणले’

नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक असताना गुन्ह्याच्या तपासात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा वापर यासारख्या विविध विषयांवर प्रशिक्षण दिले. कायदा आणि सुव्यवस्था राखणे, गुन्हेगारी प्रतिबंध, एमपीडीए, सायबर गुन्हे आणि ताणतणाव व्यवस्थापन याबाबत राज्य पोलिस दलातील आयपीएस व इतर अधिकाऱ्यांना प्रशिक्षणासह मार्गदर्शन केले. मुंबई येथे आर्थिक गुन्हे शाखेचे सह पोलिस आयुक्त म्हणून जबाबदारी पार पाडताना एनएसईएल व पॅनकार्ड असे मोठे तिकिट घोटाळे उघडकीस आणले. तसेच मुंबई येथे लोकसभा, विधानसभा निवडणुकीसह सीएए/एनआरसी आंदोलन, रामजन्मभूमी निकाल, कलम ३७० रद्द करणे, कोविड महामारी, तसेच लॉकडाऊनची अंमलबजावणी करून कायदा व सुव्यवस्था राखली. मुंबई येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त महासंचालक म्हणूनही काम पाहिले, असे चौबे यांनी सांगितले.  

वरिष्ठांकडून संधी मिळाली तसेच मार्गदर्शनही मिळाले. तसेच सर्व अधिकारी व कर्मचारी व लोकांनीही सहकार्य केले. त्यामुळे २६ वर्षे उत्तम सेवा बजावता आली. पिंपरी-चिंचवड शहर तसेच राज्य पोलिस दलासाठी आणची चांगले कर्तव्य बजावण्यासाठी प्रयत्नरत आहे.

- विनय कुमार चौबे, पोलिस आयुक्त, पिंपरी-चिंचवड

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडPoliceपोलिसPresidentराष्ट्राध्यक्षDraupadi Murmuद्रौपदी मुर्मू