लोणावळा : भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांना डोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी पाच जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.कुसगाव ग्रामपंचायतीचे सदस्य ज्ञानेश्वर कान्हू गुंड यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन कारकेवस्ती कुसगाव येथिल विजय यशवंत कालेकर, विकास भाऊ कदम (रा. औंढे) व अन्य तिन अनोळखी युवक यांच्या विरोधात आर्म अॅक्ट ३ (२५), भादंवी कलम ३२३ व अन्य कलमांन्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर गुंड, लहू गुंड व किसन गुंड हे रविवारी पवनानगर येथून एका लग्न समारंभावरुन घरी कुसगावला परत येत असताना डोंगरगाव वाडी येथील शिवसेना कार्यालयाच्या समोर गर्दी जमली होती, त्याठिकाणी मयुर जगदाळे यांनी विकास कदम यांची सुरु असलेली भांडणं सोडवली. गुंड व त्यांचे सहकारी देखिल भांडणं सोडविण्याकरिता गेले असता भांडणं करणारा विकास कदम यांनी ज्ञानेश्वर गुंड यांस 'तुला माहिती आहे का, मी कोण आहे' असे म्हणत शिविगाळ व धक्काबुक्की करण्यास सुरुवात केली. त्यावेळी शिव्या देऊ नका असे गुंड म्हणत असताना कदम याचा जोडीदार विजय कालेकर व अन्य तिन अनोळखी युवक तेथे आले त्यांनी देखिल गुंड यांना शिविगाळ करत कालेकर याने कंबरेला लावलेला पिस्तुल बाहेर काढत 'तुम्हाला खल्लास करतो' असे धमकावले. यावेळी परिसरातील लोक जमा झाल्यानंतर त्या सर्वांनी घटनास्थळावरुन पळ काढला. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक रामदास इंगवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक अमित ठोसर याप्रकरणी तपास करत आहेत.
भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्यांंना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत लोणावळ्यात जीवे मारण्याची धमकी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 05, 2018 6:34 PM
भांडणे सोडविण्यासाठी गेलेल्या युवकांना डोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार रविवारी सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास घडला आहे.
ठळक मुद्देयाप्रकरणी पाच जणांच्या विरोधात लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखलडोंगरगाववाडी येथे रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत जिवे मारण्याची धमकी