पिंपरी : हुंड्यासाठी पत्नी व तिच्या भावाचे अश्लिल फोटो फेसबुक व व्हॉटसअॅपवर टाकण्याची धमकी दिल्याप्रकरणी पतीसह सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश विजयसिंग राजपूत (रा. चंद्रनील अपार्टमेंट, बावधान खु. मुळशी), विजयसिंग मानसिंग राजपूत (रा. वाशी, नवी मुंबई ), भगतसिंग विजयसिंग राजपूत, (रा. राजपूत कॉलनी, भडगाव रोड, जळगाव), प्रतापसिंग विजयसिंग राजपूत (रा. सिडको, औरंगाबाद), विकास विजयसिंग राजपूत, गायत्री विकास राजपूत (दोघेही रा. रिद्धी-सिद्धी बिल्डिंग, सेक्टर ३१, नवी मुंबई) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी विवाहित महिलेने फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लग्नामध्ये एकूण दहा लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले असताना लग्नावेळी विवाहितेच्या माहेरकडून तीन लाख रुपये रोख व १४ तोळे सोने देवून लग्न पार पडले. त्यानंतर आरोपी यांनी वारंवार विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली. पैशांची मागणी केली. विवाहिता व त्यांच्या मुलीला जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी महिला व त्यांच्या भावाचे अश्लिल फोटो तयार करुन फेसबुक व वॉटसअॅपवर टाकण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ................
हुंड्यासाठी अश्लिल फोटो सोशल मीडियावर टाकण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2018 8:00 PM
लग्नामध्ये एकूण दहा लाख रुपये हुंडा देण्याचे ठरले असताना लग्नावेळी विवाहितेच्या माहेरकडून तीन लाख रुपये रोख व १४ तोळे सोने देवून लग्न पार पडले. त्यानंतर आरोपी यांनी वारंवार विवाहितेचा छळ करण्यास सुरुवात केली.
ठळक मुद्देहुंड्यासाठी पत्नी व तिच्या भावाचे अश्लिल फोटो फेसबुक व व्हॉटसअॅपवर टाकण्याची धमकी