पिंपरी : तुझे काही फोटो माझ्याकडे आहेत. ते मी मुंबईच्या व्हॉट्स अॅप ग्रुपवर व्हायरल करणार आहे, असे धमकावणाऱ्या अज्ञाताविरुद्ध हिंजवडीतील आयटी कंपनीत काम करणाºया तरुणीने निगडी पोलिसांकडे फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी माहिती-तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणीला एका अज्ञाताने मोबाइलवर संपर्क साधला. त्याने तरुणीचा चेहरा वापरून अश्लील फोटो तयार केले. ते फोटो मित्रमंडळींच्या ग्रुपवर व्हायरल करण्याची धमकी दिली. यातून सुटका पाहिजे असेल, तर एक मिनिटाचा नग्नावस्थेतील व्हिडीओ मला पाठव, मी कोणालाही दाखवणार नाही, असे म्हणत व्हॉट्सअॅप कॉल करून त्रास दिला. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निगडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
हॉटेल चालक दांपत्यावर हल्ला; दगडफेकीत वाहनांचे नुकसानपिंपरी : काळेवाडी, रहाटणीतील हॉटेलचालक दाम्पत्यांवर सहा ते सात जणांच्या टोळक्याने हल्ला केला. त्यांच्यावर दगडफेक केली. त्यात फिर्यादी महिलेच्या हाताला इजा झाली असून, या दगडफेकीत बळीराज कॉलनीतील आठ वाहनांचे नुकसान झाले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मालिनी संजय नखाते (वय ४०) यांनी वाकड पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. आकाश शेटप्पा कुसाळकर (रा. रामनगर, रहाटणी), संदीप सूर्यवंशी, ज्ञानेश्वर सगर, अजय म्हस्के या प्रमुख आरोपींसह त्यांच्या इतर सहा ते सात साथीदारांविरुद्ध वाकड पोलिसांनी गुन्हा दाखल झाला आहे. गुरुवारी रात्री ११ च्या सुमारास फिर्यादी व त्यांचे पती हॉटेल बंद करण्यासाठी गेले असता, तेथे दुचाकीवरून सात ते आठ जणांचे टोळके आले. त्यांच्या हातात तलवारी, हॉकी स्टिक होत्या. फिर्यादीचे पती संजय नखाते यांच्या दिशेने टोळके त्यांच्या अंगावर धावून आले. फिर्यादी महिला पुढे आली, पतीला तेथून निघून जाण्यास सांगितले. महिलांवर हल्ला करत आहात, लाज वाटत नाही का? असे म्हणताच, संदीप सूर्यवंशी हा आरोपी तलवार उगारून पुढे आला, तुम्हालाही सोडणार नाही. असे ओरडू लागताच, फिर्यादी महिला तेथून निघून जात होती, त्या वेळी दगड उचलून महिलेच्या दिशेने मारला. तिच्या हाताला जखम झाली. बळीराज कॉलनीतील मोटारींवर दगड पडल्याने मोटारींचे नुकसान झाले.
मेसेज पाहिले नसल्याने चिडून तरूणीला अपहरणाची धमकीपिंपरी : इन्स्टाग्रामवर पाठवलेले मेसेज न बघितल्याने चिडलेल्या तरुणाने महाविद्यालयीन तरुणीला अपहरणाची धमकी दिली. निगडी परिसरात ही घटना घडली असून, याप्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात निगडी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निगडी परिसरात राहणाºया महाविद्यालयीन तरुणीने इन्स्टाग्रामवरील मेसेज न बघितल्याने चिडलेल्या तरुणाने संबंधित तरुणीला अपहरणाची धमकी दिली. हा प्रकार महिनाभरापासून सुरू होता. सुरुवातीला तरुणी घाबरली. अखेर तिने धाडस दाखवत निगडी पोलिसात आरोपीविरोधात फिर्याद दिली आहे. अज्ञात आरोपीने तरुणीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर तू माझ्याशी मैत्री करशील का? मी तुला भेटायला आलोय, तुझा मोबाईल नंबर दे, अशा आशयाचे मेसेज केले होते. तरुणीने याकडे दुर्लक्ष केले. त्याचा राग मनात धरून आरोपीने तरुणीला त्रास द्यायला सुरुवात केली. तू इन्स्टाग्रामवरील मेसेज बघितले नाहीस, तर तुझे अपहरण करीन, अशी धमकी त्याने दिली. याप्रकरणी निगडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून, निगडी पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.महिलेला स्वयंपाकगृहात कोंडून दागिने पळविलेपिंपरी : तानाजीनगर, चिंचवड येथे फिर्यादीच्या घरी पैशांची मागणी करण्यासाठी आरोपी आला. फिर्यादी महिलेने पैसे देण्यास नकार दिला. त्या वेळी आरोपीने महिलेस पाणी आणण्यास सांगितले. महिला पाणी आणण्यासाठी स्वयंपाकघरात गेली असता, स्वयंपाकघराचा दरवाजा बंद करून बाहेरून कडी लावून आरोपीने दुसºया खोलीतील कपाटातून२८ हजारांचे दागिने शुक्रवारी पळवून नेले.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तानाजीनगर येथे राहणाºया रेश्मा सचिन बच्छाव या महिलेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. प्रशांत अल्बर्ट पारकर (वय २७, रा.सज्जनगड कॉलनी, रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. आरोपीने फिर्यादीच्या घरी जाऊन पैशांची मागणी केली. पैसे देण्यास महिलेने नकार दिला. त्या वेळी निदान पिण्यासाठी पाणी तरी द्या असे म्हणत आरोपी तेथेच थांबला. पाणी आणण्यासाठी महिला स्वयंपाकघरात गेली. त्या वेळी आरोपीने स्वयंपाकघराची कडी बाहेरून लावून दागिने पळवून नेले.