बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक :दोन पिस्तुल, काडतुसे हस्तगत पिंपरी : गुन्हे शाखेच्या खंडणी, दरोडा विरोधी पथकाने बेकायदा पिस्तुल बाळगल्याप्रकरणी सहयोगनगर, तळवडे येथे तीन आरोपींविरोधात कारवाई केली असून त्यांच्याकडून ६० हजार ४०० रुपये किंमतीचे दोन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुसे जप्त केली. ही कारवाई मंगळवारी करण्यात आली. मुद्देमालासह आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,ओंकार रमेश हिंगे (वय १९,रा.बिबवेवाडी),मंगेश दामू मांजरे (वय २०) आणि त्यांचा मित्र मनिष माधव निनादिया अशा तीन आरोपींविरोधात खंडणी, दरोडाविरोधी पथकाने कारवाई केली. खंडणी विरोधी पथकाला मिळालेल्या माहितीनुसार, त्यांनी सापळा रचून सहयोगनरग, ओटास्किमजवळ ओंकार आणि मंगेश या दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता, मनिष माधव निनादिया या टिंगरेनगरमधील श्रमिकनगरमध्ये राहणाऱ्या आरोपीकडून पिस्तुल खरेदी केल्याची कबुली त्यांनी दिली. पोलिसांनी टिंगरेनगर येथून मनिष या आरोपीकडे चौकशी केली असता, दोघांना पिस्तुल विक्री केल्याचे त्याने सांगितले. पोलीस आयुक्त आर. के. पद्मनाभन, अपर पोलीस आयुक्त मकरंद रानडे, सहायक पोलीस आयुक्त सतीश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खंडणी, दरोडाविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधीर अस्पत, पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बढे, पुरुषोत्तम चाटे, पोलीस कर्मचारी गणेश हजारे, राजेंद्र शिंदे, अजय भोसले, विक्रांत गायकवाड, आशिष बोटके, नितीन लोखंडे, शैलेश सुर्वे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
बेकायदा शस्त्र बाळगल्याप्रकरणी तिघांना अटक :दोन पिस्तुल, काडतुसे हस्तगत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 4:23 PM