पिंपरी : बांधकाम साईटवर सहा लाखाचा ऐवज चोरून नेणाºया तिघांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून चारचाकी वाहन व प्लम्बिंगचे साहित्य असा ८ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. हिंजवडी पोलिसांच्या तपास पथकाने ही कारवाई केली. बाबू रोनाप्पा वाघमारे (वय ३१, रा. वाघोली, पुणे, मूळ रा. गुलबर्गा, कर्नाटक), इस्माईल दिलीप तांबोळी (वय ३०, रा. वाघोली, मूळगाव औसा, लातूर) आणि दत्तात्रय उर्फ नागाप्पा हनुमंत बनसोडे (वय ३८, रा. वाघोली, मूळगाव मोटयाळ, सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मारुंजी येथील बुचडे वस्ती परिसरात एका बांधकाम साईटवर एका फ्लॅटमध्ये प्लम्बिंगचे साहित्य ठेवले होते. १७ ते २८ फेबु्रवारी दरम्यान फ्लॅटच्या बंद दरवाजाचे कुलूप बनावट चावीने उघडून सहा लाख सहा हजारांचे प्लम्बिंगचे साहित्य चोरट्यांनी चोरून नेले होते. याप्रकरणी घरफोडीचा गुन्हा हिंजवडी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला. त्यानंतर हिंजवडी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत होते. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून पोलिसांनी चोरट्यांचा माग काढला. त्यांचे कपडे व चेहरेपट्टीवरून त्यांचा शोध सुरू केला. संशयित आरोपी हिंजवडी येथील लक्ष्मी चौक येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार सापळा रचून तांबोळी व वाघमारे या दोघांना ताब्यात घेण्यात आले. साथीदार बनसोडे याच्या मदतीने चोरी केल्याचे त्या दोघांनी पोलीस चौकशीदरम्यान कबूल केले.हिंजवडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत गवारी, पोलीस निरीक्षक (गुन्हे) अजय जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अनिरुद्ध गिझे, पोलीस कर्मचारी बाळू शिंदे, किरण पवार, आतिक शेख, कुणाल शिंदे, विवेक गायकवाड, हनुमंत कुंभार, सुभाष गुरव, अमर राणे, झनकसिंग गुमलाडू, श्रीकांत चव्हाण, चंद्रकांत गडदे, विकी कदम, आकाश पांढरे, कारभारी पालवे यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे.दोन गुन्ह्यांची उकलसंशयीत आरोपींनी दोन घरफोड्या केल्याचे पोलीस चौकशीत समोर आले आहे. त्यामुळे हिंजवडी पोलीस ठाण्यात दोन गुन्ह्यांची उकल झाली. तीन लाख ८९ हजारांचे साहित्य आणि पाच लाखाचे चारचाकी वाहन असा एकुण आठ लाख ८९ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी त्यांच्याकडून हस्तगत केला आ
प्लम्बिंगचे साहित्य चोरीप्रकरणी तिघांना अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2020 8:52 PM