शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

नगर अर्बन बँक फसवूणक प्रकरणी तीन डॉक्टरांना अटक; पिंपरी-चिंचवड पोलिसांची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2021 9:09 PM

२२ कोटींचे फसवणूक प्रकरण ; न्यायालयाने डॉक्टरांना सुनावली 30 जूनपर्यंत पोलीस कोठडी

पिंपरी : नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेत झालेल्या २२ कोटी रुपयांच्या कर्ज अपहार प्रकरणात अहमदनगर येथून तीन डॉक्टरांना शुक्रवारी (दि. २५) रात्री अटक करण्यात आली. न्यायालयाने त्यांना ३० जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली.  

डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोद श्रीखंडे, अशी अटक झालेल्या तिघा डॉक्टरांची नावे आहेत. बँकेची फसवणूक करून घेतलेल्या कर्जाच्या रकमेतील सहा कोटी चार लाख रुपये या तिघा डॉक्टरांच्या खात्यावर वर्ग झाल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. नगर अर्बन बँकेच्या चिंचवड शाखेचे व्यवस्थापक महादेव साळवे यांनी चिंचवड पोलीस ठाण्यात २५ जानेवारी २०२१ रोजी फिर्याद दिली होती. त्यानुसार बबन निवृत्ती चव्हाण, वंदना बबन चव्हाण, यज्ञेश बबन चव्हाण, मंजूदेवी हरिओम प्रसाद, रामचंद्र अण्णासाहेब तांबिले, अभिजित नाथा घुले यांच्यासह कर्ज उपसमिती सदस्य व बँकेच्या संचालकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला होता.  

आर्थिक गुन्हे शाखेतील पोलीस निरिक्षक वसंत बाबर यांनी दिलेल्या माहितीनुसार, या गुन्ह्यात पोलिसांनी आतापर्यंत नगर येथील आशुतोष लांडगे याच्यासह आठ जणांना अटक केली आहे. दरम्यान लांडगे याच्या खात्यावर अपहारातील ११ कोटी रुपये वर्ग झाल्याचे तपासात समोर आले. तसेच तिघा डॉक्टरांच्या खात्यावरही रक्कम वर्ग झाल्याने या तिघा डॉक्टरांना अटक केली. या डॉक्टरांच्या खात्यावर अपहारातील रक्कम का वर्ग झाली, त्यांचा या अपहारात काही सहभाग आहे का, आदींबाबत चौकशी होणार आहे.   -------------------------------बँकेच्याविरोधात डॉक्टरांनी केली होती तक्रार अहमदनगर येथील एम्स हॉस्पिटलच्या मशिनरीसाठी नगर अर्बन बँकेत परस्पर खाते उघडून आमच्या नावे १८ कोटींचे कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी डॉ. भास्कर सिनारे, डॉ. रवींद्र कवडे व डॉ. विनोंद श्रीखंडे यांनी २७ ऑगस्ट २०१९ रोजी नगरच्या कोतवाली पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला होता. मात्र याबाबत गुन्हा दाखल न झाल्याने या तिघा डॉक्टरांनी औरंगाबाद खंडपिठात याचिका दाखल केली होती. याप्रकरणी बँकेने चौकशी समिती नेमूण दोषींवर कारवाई करावी, असे आदेश न्यायालयाने दिले. मात्र यावर काहीच कार्यवाही झाली नाही. आता बँक प्रकरणी दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात या डॉक्टरांना अटक झाल्याने या प्रकरणातील गुंता आणखी वाढला आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटकfraudधोकेबाजीdoctorडॉक्टर