शहरं
Join us  
Trending Stories
1
युवासेनेच्या आनंदावर विरजण? ‘पिक्चर अभी बाकी है’ म्हणत सिनेट निकालाला हायकोर्टात आव्हान
2
"ब्राह्मणांना मारून योगीं आदित्यनाथ...!"; हे काय बोलून गेले काँग्रेस नेते रणदीप सिंह सुरजेवाला?
3
डिझेलवर 12 रुपये तर...? जाणून घ्या, एक लिटर पेट्रोलवर किती नफा कमावतायत तेल कंपन्या?
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी बुधवारी ठाणे जिल्हा दौऱ्यावर; अधिकाऱ्यांनी घेतली पूर्वतयारी आढावा बैठक! 
5
मोदी-शाह यांनी शिंदे-फडणवीस आणि अजित पवारांनाही गुजरातला घेऊन जावे, काँग्रेसची बोचरी टीका
6
IND vs BAN, 2nd Test, Day 4 Stumps: रोहितचा 'मास्टर स्ट्रोक'; चौथ्या दिवसाअखेर बांगलादेशचा दुसरा डाव २ बाद २६ धावा
7
माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवेंच्या कन्या संजना जाधव यांच्या गाडीला अपघात, थोडक्यात बचावल्या
8
इस्रायलने आपल्या आणखी एका शत्रूचा केला खात्मा, हमास कमांडर फतेह शेरीफ ठार
9
“ही निवडणूक आरक्षणाच्या मुद्द्यावरच लढली जाईल, ठाकरे गट-भाजपा पडद्यामागे...”: प्रकाश आंबेडकर
10
Mithun Chakraborty : "उपाशी पोटी फूटपाथवर झोपलो, बेरोजगार..."; मिथुन चक्रवर्तींनी लूकमुळे केला रिजेक्शन सामना
11
WhatsApp वर सुरू आहे स्कॅमर्सकडून फ्रॉडगिरी, स्वत:ला सुरक्षित ठेवायचं असल्याल वापरा या टिप्स
12
"चांगल्या माणसाला कायमच हार पत्करावी लागते", 'बिग बॉस'च्या घरातून पॅडीच्या एक्झिटनंतर मराठी अभिनेत्याच्या पत्नीची पोस्ट
13
"मोदींनी जितका पैसा अदानींना दिला, मी तितका गरिबांना देईन", राहुल गांधी काय बोलले?
14
खटा-खट... धडा-धड...! अनिल अंबानींच्या कंपनीचा शेअर करतोय मालामाल! ₹9 वरून पोहोचला ₹340 वर
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारचा मोठा निर्णय; गायीला दिला 'राज्यमाते'चा दर्जा
16
मुस्लिमांची संख्या वाढलीय, आता तुमची सत्ता संपणार; सपा आमदाराच्या विधानानं नवा वाद
17
तुम्ही दिवसभरात किती पाणी प्यायला हवं? संशोधन काय सांगतं?
18
भारतात WANTED असलेला झाकीर नाईक पाकिस्तानात पोहोचला; 'या' मोठ्या शहरात घेणार सभा
19
मुकेश अंबानींच्या Reliance मध्ये मोठी घसरण; शेअर बाजार हादरला, जाणून घ्या कारण
20
टेस्टमध्ये टीम इंडियाचा बेस्ट शो! धावांची 'बरसात' अन् फिफ्टी, सेंच्युरीसह जलद 'द्विशतकी' रेकॉर्ड 

अधिकाऱ्याच्या अंगावर फेकली शाई

By admin | Published: July 08, 2017 2:16 AM

तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी

लोकमत न्यूज नेटवर्कतळेगाव दाभाडे : तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सोमाटणे जलउपसा केंद्रावरील वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने ऐन पावसाळ्यात पाणी मिळत नसल्याने भाजपा-जनसेवा विकास समितीच्या महिला कार्यकर्त्यांनी महावितरणची येथील महिला अधिकारी आणि नगरसेवकांनी वडगाव केंद्र अधिकाऱ्याच्या तोंडावर शाई फेकून निषेध व्यक्त केला. विद्युतपुरवठा सुरळीत न केल्यास महावितरण कार्यालयाला टाळे ठोकण्याचा इशारा पाणीपुरवठा समितीचे सभापती तथा उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी या वेळी दिला. गेल्या ७२ तासांपासून पवनानदीवरील सोमाटणे पंप-हाऊसचा वीजपुरवठा वारंवार खंडित होत असल्याने संपूर्ण तळेगाव शहरातील पाणीपुरवठा यंत्रणेस त्याचा फटका बसला आहे. त्याच्या निषेधार्थ उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या नेतृत्वाखाली सत्ताधारी भाजपा व जनसेवा विकास समितीने महावितरणच्या येथील कार्यालयावर आज धडक मोर्चा काढला.वीजपुरवठा सातत्याने खंडित होत असल्याबाबत नगरपालिकेने वारंवार तक्रारी करूनही महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी कोणतीही उपाययोजना न केल्याने तसेच अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरे न दिल्याने दोन्ही पक्षाचे नगरसेवक आणि संतप्त कार्यकर्त्यांनी या कार्यालयातील अधिकाऱ्यांच्या अंगावर काळी शाई फेकली. दरम्यान, महावितरण कंपनीचे उपकार्यकारी अभियंता एम. पी. तेलके यांच्यावर मोर्चेकरांना प्रश्नांचा भडीमार केला. या वेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, सत्तारूढ पक्षनेते सुशील सैंदाणे, विरोधी पक्षनेत्या हेमलता खळदे, भाजपाचे शहराध्यक्ष संतोष दाभाडे-पाटील, नगरसेवक संदीप शेळके, अरुण भेगडे, संग्राम काकडे, संतोष शिंदे, अमोल शेटे, अतुल मराठे, नगरसेविका नीता काळोखे, शोभा भेगडे, काजल गटे, अनिता पवार, रजनी ठाकूर, मंगल जाधव, आशितोष हेन्द्रे, अजय भेगडे मोर्चात सहभागी झाले होते.दरम्यान मावळ तालुक्यामध्ये अनेक नागरिकांनी सेकंड होमसाठी पसंती दिली आहे. परंतु वाढत्या भारनियमनाच्या त्रासाने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्याचा परिणाम बांधकाम व्यावसायावरही झाला आहे. तसेच उद्योगधंद्यावरही मोठ्याप्रमाणात परिणाम होत आहे. वीजेच्या भारनियमन आणि खंडीत वीजपुरवठ्यातून मावळ तालुक्याची सुटका करावी अशी मागणी नागरिक करीत आहेत. परंतु याकडे विद्युत महावितरणच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाले आहे. अशी तक्रार परिसरातील नागरिक करत आहेत. नागरिकांचे हाल : पाणी मिळत नसल्याने गैरसोयमहावितरण कंपनीस नगरपालिका दरमहा सुमारे २५ ते ३० लाख रुपये वीजबिलापोटी देत असते. सर्वात जास्त महसूल देणाऱ्या ग्राहकास कंपनीकडून व्यवस्थित सेवा मिळत नाही. वारंवार वीजपुरवठा खंडित होत असल्याने पाणीउपसा करणे आणि वितरण यांचा मेळ साधता येत नाही. ऐन पावसाळ्यात लोकांचे पाण्यावाचून हाल सुरू आहेत. वीज कंपनीचे अधिकारी सार्वजनिक पाणी वितरणाच्या समस्येबाबत अक्षम्य दुर्लक्ष करीत आहेत. - सुनील शेळके, उपनगराध्यक्ष