शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

आजपासून पाणीपुरवठा पूर्ववत

By admin | Published: July 02, 2017 2:50 AM

महापालिकेने अवलंबलेला १० टक्के पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे़ रविवारपासून पूर्ववत नियमित पाणीपुरवठा होईल, अशी

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : महापालिकेने अवलंबलेला १० टक्के पाणीकपातीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे़ रविवारपासून पूर्ववत नियमित पाणीपुरवठा होईल, अशी माहिती महापौर नितीन काळजे यांनी आज दिली. शहरातील नागरिकांना मुबलक व पुरेसा पाणीपुरवठा होईल, असा दावा काळजे यांनी केला. पिंपरी-चिंचवड शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. पावसाने ओढ दिल्यास पाणीटंचाईला सामोरे जावे लागू नये म्हणून महापालिकेने २ मे २०१७ ला २५ टक्के पाणी कपातीचा निर्णय घेतला. शहरवासीयांना दिवसाआड पाणीपुरवठा सुरू केला होता. ३० मे २०१७ ला पाणीकपात २५ टक्यांवरून १० टक्के केली होती. परंतु, पाणीपुरवठा दिवसाआडच सुरू होता. १३ जून २०१७ पासून पाणी कपात मागे घेऊन शहरवासीयांना रोज पाणीपुरवठा सुरू केला. परंतु, १० टक्के पाणी कपात कायम ठेवली होती. आता ही पाणीकपात देखील मागे घेण्यात आली आहे. यामुळे शहरातील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा होणार आहे़ पवना धरणात ३१ मे रोजी २०.२८ टक्के पाणीसाठा होता. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात पावसाने हजेरी लावली. पंरतु, त्यांनतर थोड्याच दिवसांत पावसाने दडी मारली. २५ जूनपासून पुन्हा पावसाच्या सरी कोसळल्या. त्यामुळे ९८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली. त्यानंतर आतापर्यंत तब्बल ६८६ मिमी पावसाची नोंद झाली. सध्या धरणात २.५७६ टीएमसी पाणीसाठा आहे. पाच दिवसांत पवना धरण साठ्यात १३.१५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. धरणातील पाणीसाठा ३३.४३ टक्के इतका आहे.