शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

ग्रामस्थांनी बंद पाडला महामार्गावरील टोल

By admin | Published: February 13, 2017 1:55 AM

पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर शनिवारी (दि. ११) मध्यरात्री बारा वाजल्यापासून पथकर आकारणी सुरू करण्यात येणार होती

पिंपळवंडी : पुणे-नाशिक महामार्गावर चाळकवाडी येथील टोलनाक्यावर शनिवारी (दि. ११) मध्यरात्री बारा वाजल्यापासून पथकर आकारणी सुरू करण्यात येणार होती, संतप्त ग्रामस्थांनी टोलनाक्यावरील वसुलीचे काम बंद पाडले.राजगुरुनगर ते सिन्नर यादरम्यान चौपदरी रस्त्यावर काम करण्यात आले असून या महामार्गावर जुन्नर तालुक्यात चाळकवाडी आणि संगमनेर तालुक्यात हिवरगाव पावसाळ्यात या ठिकाणी टोलनाके उभारण्यात आले आहेत. भारतीय राजमार्ग प्राधिकरणाच्या करारपत्रकानुसार दि. ३१ जानेवारी रोजी १०४.६३६ किलोमीटर लांबीचा रस्ता पूर्ण झाला असल्याबाबतचे पत्र संबंधित यंत्रणेकडून मिळाले असल्यामुळे व्यावसायिक वापरासाठी रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने पथकर वसुली करण्यास मान्यता दिली आहे. याबाबतची जाहीर सूचना प्रसिद्ध केल्यानंतर शनिवारी मध्यरात्री बारा वाजल्यापासून पथकर वसुलीसाठी सुरुवात करण्यात येणार होती. परंतु अद्याप आळेफाटा बाह्यवळण रस्ता, सद्गुरुनगर व पिंपळवंडी बसस्टँड येथील उड्डाणपूल, आळे येथील ग्रामपंचायतीच्या पाण्याच्या पाइपलाइन दुरुस्ती अशी अनेक कामे अपूर्णावस्थेत आहेत. तसेच ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी व घरे गेली आहेत, त्यांना अद्याप नुकसानभरपाई मिळाली नाही. महामार्गाचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले आहे. त्यामुळे टोलवसुली न करण्याची ग्रामस्थांची मागणी होती. (वार्ताहर)