पिंपरी : राष्ट्रवादी काँग्रेसच्या परदेश दौऱ्यांना असणारा विरोध भाजपा स्वत: सत्तेत आल्यानंतर मात्र मावळला आहे. एकेकाळी विरोध करणारेच आता दौऱ्यात सहभागी होत आहेत. काटकसर व बचतीचा देखावा करून दीड वर्षांत १६ दौऱ्यांवर कोट्यवधी रुपये उधळले आहेत.
महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता येऊन दीड वर्ष झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या काळापेक्षा भाजपाच्या कालखंडात दौऱ्यांचे पेव फुटले आहे. देश-परदेश दौरे काही कमी होत नसल्याचे धक्कादायक चित्र आहे. सत्ता आल्यानंतर फुटकळ बचतीचे धोरण स्वीकारून भाजपा पदाधिकाºयांनी स्वत:ची पाठ थोपटून घेतली. जकात व एलबीटी बंद झाल्याने पालिकेच्या उत्पन्नाचा मोठा स्रोत कमी झाला आहे. पालिकेचे उत्पन्न वाढविण्यापेक्षा खर्चावरच भर दिला जात आहे.सत्ताधाऱ्यांच्या वळचणीला विरोधक
दौऱ्यांना विरोध करणे विरोधकांनी सोडले आहे. कारण विरोधी पक्षाचे नेतेच दौºयात सहभागी होऊ लागले आहेत. दिल्लीतील शाळा पाहणी आणि स्मार्ट सिटीच्या दौºयात गटनेते सहभागी झाले होते. विरोधकांचा विरोध मावळण्यासाठी सत्ताधाºयांनी विरोधकांना दौºयांत सहभागी करून घेतले आहे. अभ्यास दौºयाच्या नावाखाली करदात्यांच्या पैशावर सहलीचा आनंद सत्ताधारी व विरोधक मिळून लुटत आहेत.अहवाल देणार कोण?भाजपाची सत्ता आल्यानंतर पहिल्या स्थायी समिती सभापती सीमा सावळे यांनी दौºयांना विरोध करण्यापेक्षा दौरे करा, पण अहवाल सादर करावा, अशी सूचना केली होती. मात्र, दीड वर्षात एकही दौºयाचा अहवाल सादर केलेला नाही. त्यामुळे सत्ताधाºयांच्या पारदर्शक कारभाराबाबत चर्चा आणि टीका होत आहे.महापालिका अधिकारी, पदाधिकाºयांचे असे आहेत दौरे...माजी महापौर नितीन काळजे यांचा बर्सिलोना दौरा,आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा स्वीडन दौरा,अधिकाºयांचा दक्षिण आफ्रिकेतील देशांचा दौरा,नगरसेवकांचा अहमदाबाद बीआरटीएस दौरामहिला व बाल कल्याण समितीचा केरळ दौरानगरसेवक व अधिकाºयांचा दिल्ली दौराक्रीडा समितीचा पटियाला व दिल्ली दौरामहापौरांचा येरेव्हान, आर्मेनिया दौरामहापौर परिषदेसाठी महापौर यांचा दौराआयुक्तांचे देशातर्गंत व परदेश दौरास्मार्ट सिटीसाठी गटनेत्यांचा स्पेन दौराशहर समितीच्या नियोजित परदेश दौरा
कराच्या पैशांची उधळपट्टी थांबवापरदेश दौरे : समाजवादी पार्टीची महापालिकेकडे मागणीपिंपरी : महापालिकेच्या वतीने देश-परदेश अभ्यास दौरे वाढले आहेत. केवळ सहल व पर्यटनासाठी हे दौरे आयोजित केले जातात. त्याचा प्रत्यक्ष शहराच्या विकासात काहीच लाभ होत नाही. पालिकेच्या खर्चाने होणारे अभ्यास दौरे रद्द करावेत. पदाधिकारी व नगरसेवकांनी स्वखर्चाने दौरे करावेत, अशी मागणी समाजवादी पक्षाने केली आहे.
समाजवादी पक्षाचे शहराध्यक्ष रफिक कुरेशी यांनी पदाधिकाऱ्यांच्या दौºयांवर टीका केली आहे. कुरेशी म्हणाले, महापालिकेचे मुख्य आर्थिक स्रोत असलेले जकात व एलबीटी बंद झाल्याने उत्पन्न घटले आहे. त्यामुळे भाजपाने महापालिकेत काटकसर करून बचतीचे नवे धोरण अवलंबले आहे. सत्ताधाºयांनी काही फुटकळ खर्चाला फाटा देत शाबासकी मिळविली. बचतीचे धोरण असूनही, सत्ताधाºयांकडून वारेमाप उधळपट्टी केली जात आहे.अभ्यासाच्या नावाखाली वारंवार जगभरात देश-परदेश दौरे आयोजित केले जात आहेत. त्या दौºयांत पदाधिकारी व नगरसेवकांसह अधिकारीही सामील होत आहेत. स्मार्ट सिटी, महापौर परिषद, मेट्रो सिटीची पाहणी, बीआरटीएसची पाहणी, शाळांचा दर्जा, महिलांसाठी लघुउद्योग, स्टेडिअम, स्वच्छ भारत अभियान, परिषद, प्रदर्शन अशा विविध कारणांसाठी दौरे आयोजित करण्याचा सपाटा भाजपा पदाधिकाºयांनी लावला आहे.स्वखर्चाने कराव्यात सहलीकररूपी पैशांतील कोट्यवधींची उधळपट्टी करण्यात येत आहे. तसेच, एकाही अभ्यासदौराचा अहवाल सर्वसाधारण सभेपुढे सादर केला गेलेला नाही. त्यामुळे असे दौरे रद्द करावेत. ज्या नगरसेवक व पदाधिकाºयांना दौºयास जायचे आहे, त्यांनी स्वखर्चाने जावे अन्यथा आंदोलन करण्यात येईल.