लोकमत न्यूज नेटवर्कलासुर्णे : बेलवाडीचे पहिले मानाचे अश्व रिंगण पार पडल्यानंतर पालखी सोहळा निमगाव केतकी येथे मुक्कामी मार्गस्थ झाला. दुपारी पावसांच्या सरी झेलत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे लासुर्णे येथे आगमन झाले. या वेळी गावकऱ्यांनी तोफांच्या सलामी देत पालखी सोहळ्याचे जंगी स्वागत केले.निलकंठेश्वर प्रतिष्ठान व निलकंठेश्वर हॉस्पिटल यांच्या वतीने २६८ वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. पालखी सोहळ्यासाठी वालचंदनगर पोलीस ठाण्याच्या वतीने बंदोबस्त ठेवण्यात आला होता. साखर संघाचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, सरपंच निर्मला चव्हाण, जि. प. सदस्य सागर भोसले, पंचायत समिती सदस्य अॅड. हेमंत नरुटे, छत्रपतीचे संचालक अमोल पाटील, भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष गजानन वाकसे, विजय निंबाळकर, इंदापूर अर्बन बँकेचे संचालक वसंत पवार, ग्रामपंचायत सदस्य सोमनाथ लोंढे, शशिकांत निंबाळकर, आनंद लोदाडे, दिलीप पांढरे, पंकज निंबाळकर, तलाठी सचिन करगळ, ग्रामविकास अधिकारी व्होरकाटे आदींनी पालखी सोहळ्याचे स्वागत केले.जंक्शन येथे वसंत मोहोळकर, राजकुमार भोसले, संजय शिंदे, रामेश्वर माने, रोहित मोहळकर, अॅड. दीपक लोखंडे, डॉ. संजीव लोंढे, दिलीप लोहकरे, बाळासाहेब जठार, रवींद्र तांबे, चंद्रकांत सोळसे, पुंडलिक सोनवणे, फिरोज सय्यद, बाळासाहेब होळ आदी उपस्थित होते.सणसर येथे शिरखुर्मा वाटपभवानीनगर : मुस्लीम बांधवांच्या रमजान ईद सणाच्या काळातच सणसर (ता. इंदापूर) येथे संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे मुक्कामी आगमन होते. गेल्या वर्षीप्रमाणे यंदादेखील हा योग आला. मुस्लीम बांधवांनी रमजान ईदच्या सणाच्या आनंदात वारकरी भाविकांना सामील करून घेत हा योग साधला. या वेळी वारकरी भाविकांना शिरखुर्मा वाटप करण्यात आले. तर वारकरी भाविकांनी देखील मुस्लीम बांधवांना अलिंगन देत ‘र्ईद मुबारक’च्या शुभेच्छा दिल्या. सणसर येथील धार्मिक सलोख्याचा क्षण आज अनेक वारकरी भाविक जगले.सोमवारी (दि. २६) रमजान ईद आहे. या दिवशी शिरखुर्मा देऊन मुस्लीम बांधव आनंद व्यक्त करतात. सणाच्या आनंदात वारकरी भाविकांना सहभागी करुन घेतात. मुस्लीम कमिटीचे तालुक्याचे उपाध्यक्ष शब्बीर काझी, मुबारक सय्यद, हनिफ तांबोळी, अजिज तांबोळी, निवृत्त प्राचार्य रज्जाक मणेरी यांच्या या युवकांनी त्यासाठी पुढाकार घेतला. आमदार दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते वाटप करून उपक्रमाची सुरुवात झाली. या वेळी सणसरचे उपसरपंच अभयसिंह निंबाळकर, छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष अमरसिंह घोलप, संचालक रणजितसिंह निंबाळकर, प्रदीप निंबाळकर, विक्रमसिंह निंबाळकर उपस्थित होते.
सोहळ्यास तोफांची सलामी
By admin | Published: June 27, 2017 7:19 AM