पिंपरी : शहरातील पुणे-मुंबई महामार्गावर आज भलतीच शिस्त पहायला मिळाली. सर्व चौकांमध्ये वाहतूक पोलीस हातात बॅटन, वॉकीटॉकी आणि तोडांत शिट्टी घेऊन वाहतुकीचे नियमन करत होते. वाहनचालकांनीही आज सिग्नल तोडण्याच्या सवयीला मुरड घातलेली पहायला मिळत होती. विविध चौकांसाठी डोकेदुखी ठरणाऱ्या रिक्षाचालकांचा कोणत्याही चौकात अस्ताव्यस्त ठिय्या नव्हता. शहरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक आज अगदी सुरळीत सुरू होती. हे सर्व पाहून सामान्य नागरिक मात्र अचंबित झाले होते. शहरात भाजपाच्या प्रदेश कार्यकारणीचे दोन दिवसीय अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनासाठी मुख्यमंत्री व केंद्रीय मंत्री आले होते. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांचे नियोजन दिसून आले.(प्रतिनिधी)
वाहतुकीला ‘एकाएकी’ शिस्त
By admin | Published: April 27, 2017 5:02 AM