हिंजवडी : सालाबादप्रमाणे यंदाही आयटीनगरी हिंजवडी येथे होत असलेला ग्रामदैवत श्री. म्हातोबा देवाचा उत्सव तसेच, पारंपारिक बगाड मिरवणूकीच्या पार्श्वभूमिवर वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहे. मंगळवार (दि.२३) दुपारी बारापासून बगाड मिरवणूक संपेपर्यंत हे बदल लागू असणार आहे.
परिसरातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच, बगाड मिरवणुक निर्विघ्नपणे पार पडणेकरिता हिंजवडी, वाकड वाहतूक मार्गात काही बदल करण्यात आल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, सहकार्य करण्याचे आवाहन पिंपरी चिंचवड वाहतूक विभागाकडून करण्यात आले आहे.
हिंजवडी, वाकड मार्गावर असे आहेत बदल :-
१) टाटा टी जंक्शन ते वाकड नाका जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, टाटा टी जंक्शन चौक येथुन, लक्ष्मी चौक-भूमकर चौक मार्गे इच्छित स्थळी.
२) जॉमेट्रीक सर्कल ते वाकडनाका जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, मेझा-९ चौकातुन डावीकडे वळून, लक्ष्मी चौक - भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी.
३) शिवाजी चौक ते भुमकर चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, इंडियन ऑईल चौक मार्गे, वाकड गाव येथुन इच्छित स्थळी.
४) इंडियन ऑईल चौक ते विनोदे वस्ती चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, शिवाजी चौक व वाकडगाव मार्गे इच्छित स्थळी.
५) इंडियन ऑईल चौक ते वाकडनाका, सयाजी अंडरपास जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, वाकड ओव्हर ब्रिजवरुन, वाकडगाव मार्गे इच्छित स्थळी.
६) मुळा नदी ब्रिज पंक्चर ते वाकडनाका (भुजबळ चौक) जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद.पर्यायी मार्ग, मुळा नदी ब्रिज पंक्चर येथुन, सर्व्हिस रोडने वाकड गाव व हिंजवडीकडे जाणारी वाहतुक हायवेने सरळ भुमकर चौक मार्गे इच्छित स्थळी जाईल.
७) मारुजी वाय जंक्शन ते कस्तुरी चौक व शिवाजी चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, मारुंजी वाय जंक्शन येथून, उजव्या बाजुला वळुन विनोदे वस्ती मार्गे लक्ष्मी चौक व पुढे इच्छित स्थळी जाईल. तसेच, विनोदे वस्ती येथुन कस्तुरी चौक सरळ पुढे इंडीयन ऑईल चौक मार्गे, शिवाजी चौकाकडे जातील.
८) कस्पटे चौक ते वाकडगाव चौक जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, कस्पटे चौक येथुन उजवी कडे वळून, जगताप डेअरी चौक मार्गे इच्छित स्थळी.
९) मानकर चौक ते वाकडगाव चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, काळेवाडी फाटामार्गे इच्छित स्थळी.
१०) कस्पटे कॉर्नर ते वाकड गाव चौकाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, म्हातोबा चौक मार्गे, पिंक सिटी रोडने इच्छित स्थळी तसेच, वाहतूक मानकर, कस्पटे चौकमार्गे इच्छित स्थळी जाईल.
११) वाकड गाव चौकाकडून वाकड गावठाण आणी वाकड नाक्याकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, दत्तमंदिर रोडने इच्छित स्थळी.
१२) जाग्वार शोरुम ते सयाजी अंडरपासकडे सर्व्हिस रोडने जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहतुकीस प्रवेश बंद. पर्यायी मार्ग, सर्व्हिस रोडने न जाता, हायवे रोडने इच्छित स्थळी.