लोणावळा : मुंबई - पुणे महामार्गावर आज सकाळ पासून वाहनांची संख्या वाढल्याने निर्माण झालेल्या वाहतूक कोंडीचा फटका ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या सिंधूताई सपकाळ यांना बसला आहे. रात्री साडेदहाच्या सुमारास खंडाळा घाटातील अंडा पाॅईट परिसरात पुण्याकडे येताना सिंधूताई यांची वाहने वाहतूक कोंडीत तासांहून अधिक काळासाठी आडकल्याने ताईंनी संताप व्यक्त केला. सलग सुट्यांमुळे आज सकाळपासून वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली होती. दिवसभर वाहनांची ही कोंडी कायम होती. दिवसभर वाहतूक कोंडीचा सामना केल्यानंतर घाट क्षेत्रात अनेक वाहने बंद पडल्याने कोंडीमध्ये भर पडली होती. बंद पडलेल्या गाड्यांमध्ये टोयोटा कंपनीच्या गाड्या मोठ्या संख्येने होत्या. या बंद पडलेल्या वाहनांमुळे निर्माण झालेल्या कोंडीत सिंधुताई यांच्या ताफ्यातील गाड्या बराच काळ आडकल्याने व मदत यंत्रणा देखील उपलब्ध नसल्याने सिंधुताई यांनी संताप व्यक्त केला.
मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक कोंडीचा सिंधुताई सपकाळ यांना फटका
By ऑनलाइन लोकमत | Published: December 23, 2017 11:49 PM