लोकमत न्यूज नेटवर्कतळवडे : देहू-आळंदी मार्गावर प्रवाशांना घेऊन जाणारी बस सायंकाळच्या सुमारास तळवडे येथील जुन्या जकात नाक्यासमोर बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला. अशा प्रकारे या रस्त्यावर वारंवार बस बंद पडत असल्याने प्रवाशांना विनाकारण त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार प्रावासी करत आहेत.देहू येथून सायंकाळच्या सुमारास पंचवीस ते तीस प्रवाशांना घेऊन तळवडे मार्गे आळंदीला निघालेली भोसरी आगाराची एम.एच.१२ के.क्यू. ०२१० या क्रमांकाची बस तळवडे येथील जुन्या जकात नाक्याजवळ आली असता अचानक बंद पडली. या वेळी बसमध्ये दहा बारा वारकरी तसेच अन्य प्रवासी प्रवास करत होते. त्यानंतर सर्व प्रवासी रस्त्यावर उतरले यामध्ये चालक आणि वाहक हेही रस्त्यावर उभे राहून पाठीमागून येणाऱ्या अन्य बसची वाट पाहात होते. अशा प्रकारे वारंवार बस फेल होत असल्याने बसमध्ये प्रवास करणाऱ्या नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. आदी कारणामुळे बसने प्रवास करण्याऐवजी नागरिक सहा आसनी रिक्षा तसेच इतर खासगी वाहनाने प्रवास करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे अशा नादुरुस्त बस रस्त्यावर उतरवू नयेत जेणेकरून प्रवाशांना त्रास होणार नाही. याकडे व्यवस्थापनाने लक्ष देणे गरजेचे आहे.
बस बंद पडल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा
By admin | Published: June 28, 2017 4:09 AM