पवनानगर : पवनानगर ते लोणावळा रस्त्यावर असलेल्या पवनाधरणाच्या जवळच रस्ताची साईटपट्टी दुपारी साडे बाराच्या वाजण्यास सुमारास माती व मुरुम ढासळुन खोलवर वाहुन गेल्यामुळे वाहतुकीस मोठ्या प्रमाणावर अडथळा निर्माण झाला आहे. जवण ते लोणावळा या रस्त्याचे गेली चार ते पाच महिन्यापासुन दुरुस्ती चे काम चालु असुन ढासळलेल्या भागाचे काम काही महिन्यापुर्वी झाले असुन ऐन पावसाळ्यात या नविन दुरुस्त केलेल्या रस्त्याची साईटपट्टी ढासळ्याने नागरिक मोठ्या प्रमाणावर रस्त्याच्या कामासंदर्भात प्रश्न उपस्थित करत आहेत.
पवनाधरण परिसरात आज सुट्टीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर राज्य व परराज्यातुन पर्यटक आले असुन परिसरात मोठ्या प्रमाणावर मुसळधार पाऊस पडत असल्याने पवनानगर ते लोणावळा वाहतुक विस्कळीत झाली आहे.परिसरात पावसाचा सकाळ पासुन कमी झाला असुन परिसरात पर्यटक मोठ्या प्रमाणावर आल्याचे दिसत आहे परिसरातील आंबेगाव, शिंदगाव, पवनाधरण, लोहगड, विसापुर, तुंग,तिकोणा,दुधिवरे या ठिकाणी पर्यटकांनी मोठ्या प्रमाणावर गर्दी पाहवयास मिळत आहे. लोणावळा येथील भुशी धरण ओरफुल झाल्यावर या ठिकाणी लोणावळा नगरपरिषदेने या ठिकाणी जाण्यास मनाई केली असल्याने पर्यटकांनी पवनमावळ च्या परिसरात येण्यास सकाळ पासुन सुरुवात केली आहे. परिसरातील धबधबे ओसाडून वाहत असल्याने पर्यटक भिजण्याचा आंनद घेताना दिसत आहे..