शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
3
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
4
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
5
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
6
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
7
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
8
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
9
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
10
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
11
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
12
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
13
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
14
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
15
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी
16
अदानींना डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून दिलासा मिळणार? नवं सरकार मागे घेऊ शकते लाचखोरीचा खटला
17
धक्कादायक! संतापलेल्या महिला सफाई कर्मचाऱ्याने सरपंचाला केली चपलेने मारहाण
18
टीम इंडियाचा कॅप्टन रोहित ऑस्ट्रेलियात पोहचताच कोच गंभीर परतणार मायदेशी; जाणून घ्या त्यामागचं कारण...
19
विधानसभेत EVM ने केला घात?; शरद पवारांच्या पक्षाच्या बैठकीत सूर; मोठं आंदोलन उभारणार!
20
या दिवशी होणार राज्याच्या नव्या मुख्यमंत्र्यांच्या नावाची घोषणा, शिंदे गटाच्या बड्या नेत्याचा दावा 

वाहतुकीच्या नियमांची ऐशीतैशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 29, 2018 2:53 AM

मध्यवर्ती शहरात बेशिस्त; वाहतूककोंडीची ‘डोकेदुखी’, प्रशासनाचे होतेय दुर्लक्ष, कारवाईकडे काणाडोळा

पिंपरी : महापालिकेचे रस्त्यावरील अनियमित फलक, दुतर्फा पार्किंग, अरुंद रस्त्यामुळे होणारी वाहतूककोंडी या सर्व समस्यामुळे वाहतुकीच्या नियमांचा खेळखंडोबा झाला आहे. शहरात येणारा सर्व पेठांचा भाग, मुख्य रस्ता, मध्यवर्ती भागात नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.पिंपरी कॅम्प आणि पिंपरी उड्डाणपुलावरच्या रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे पालन केले जात नाही. तर त्या भागातील बंद सिग्नल, खड्डे, फलके, पार्किंग अशा अनेक समस्या ‘लोकमत’ पाहणीतून दिसून आल्या आहेत.शहरातील अनेक वाहतुकीच्या समस्या दिसून येतात. मोरवाडी येथे नो-पार्किंग फलकांसमोर दुचाकी पार्किंग केली जाते. या चौकात नो-पार्किगचे फलक लावूनही दररोज दुतर्फा पार्किंग केले जाते. या फलकांसमोर दुचाकी वाहनांची पार्किंग असूनही त्याठिकाणी चार चाकी वाहने लावली जातात. पिंपरी कँम्पातील रस्त्यावर मोठे ट्रक माल उतरवण्यासाठी थांबतात. जवळपास एक-दीड तास ही वाहने तिथून हलत नाहीत. या रस्त्यावरून येणारी बस व इतर मोठ्या वाहनांना जाण्यास अडथळा निर्माण होतो.तसेच रस्त्यावर चारचाकी वाहने पार्क केली जातात. वाहनचालकांना गोष्टीचा खूप त्रास होतो. रस्ता ओलांडण्यास नागरिकांना सिग्नलची मदत होत असते. परंतु सिग्नल तोडणाऱ्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिक, लहान मुले, व महिलांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागतो. नियमांचे उल्लघंन करणाºया वाहनचालकांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांमधून होत आहे.अरुंद रस्त्यामुळे अडचणमेट्रोच्या कामामुळे मोरवाडी चौक ते पिंपरी चौक हा रस्ता अरुंद झाला आहे. या ठिकाणी दुतर्फा पार्किंग केली जाते. पोलीस नेहमी येऊन कारवाई करतात, वाहनांना जॅमर लावतात. पण काही उपयोग होत नाही. दिवसेंदिवस ही वाहतुकीची समस्या वाढत चालली आहे.पिंपरीहून निगडीकडे जाणाºया रस्त्यावर रिक्षाचालक रस्त्यात रिक्षा उभ्या करतात. बºयाच वेळा वाहतूक पोलीस या रिक्षात बसून असतात. त्यामुळे रिक्षाचालकांवर कारवाई कोण करणार, हा प्रश्न अनुत्तरित आहे.नो र्पाकिंगमध्ये केले जाते पार्किंगनिगडी प्राधिकरणातील पवळे चौकात खाद्यपदार्थच्या खूपच गाड्या दिसून येतात. येथे पीएमपीचा बसथांबा आहे. त्या ठिकाणी या गाड्या उभारण्यात आल्या आहेत. या चौकात चारही बाजूने वाहने वेगाने येतात. त्यामुळे विस्कळीत वाहन व्यवस्था दिसून येते. गुरुवारी येथील वाहतूक नियंत्रक दिवे बंद असतात. त्यामुळे या ठिकाणी अपघाताच्या घटना घडतात. येथील कोहिनूर आर्केडजवळ नो पार्किंगमध्ये वाहने उभी केली जातात. या ठिकाणी पोलिसांची कारवाई होते. पण नावापुरतीच असल्याने पुन्हा परिस्थिती जैसे-थे आहे.टिळक चौकात सिग्नलची गरजटिळक चौक ते भेळ चौक या रस्त्यावर पी १, पी २ अशी फलके लावूनही दुतर्फा पार्किंग केले जाते. तसेच या रस्त्यावर असणाºया हॉटेलसमोर चारचाकी वाहने पार्क केली जातात.त्यामुळे येथे वाहतूककोंडी निर्माण होते. तसेच मोती चौकात पाणीपुरी, वडापाव, डोसा, इडली चटणी अशा खाद्यपदार्थ गाड्या आहेत.यामुळे नागरिक या ठिकाणी खाद्यपदार्थाचा आस्वाद घेत असतात. रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. मोती चौक हा मुख्य रस्त्यावर आहे. या चौकात सिग्नलची गरज असूनही सिग्नल नाही.

टॅग्स :Trafficवाहतूक कोंडीroad transportरस्ते वाहतूकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड