शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

परीक्षा काळात प्रशिक्षणाचा घाट; ‘ईसा’चा विरोध, विद्यार्थ्यांचे होणार शैक्षणिक नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2018 4:31 AM

नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन स्कूलिंग योजनेअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक शाळेत क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे.

पिंपरी : नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ ओपन स्कूलिंग योजनेअंतर्गत शिक्षकांना प्रशिक्षण सक्तीचे करण्यात आले आहे. सध्या प्रत्येक शाळेत क्रीडा महोत्सव, सांस्कृतिक कार्यक्रम सुरू आहेत. त्यानंतर लगेच विद्यार्थ्यांना परीक्षेला सामोरे जावे लागणार आहे. ऐन परीक्षेच्या काळात शिक्षकांना सलग पंधरा दिवस प्रशिक्षणाचा घाट घालण्यात आला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होण्याच्या शक्यता असल्याने शहरातील ‘ईसा’ (इंडिपेंडंट इंग्लिश स्कूल असोसिएशन) संघटनेने प्रशिक्षणास विरोध दर्शविला आहे.‘ईसा’च्या वतीने शिक्षण विभाग व शिक्षण अधिका-यांना त्याविषयीचे निवेदन दिले आहे, अशी माहिती अध्यक्षा जागृती धर्माधिकारी यांनी दिली. एस. श्रीधर, राजेंद्र सिंग, व्ही.जे पवार, विद्या नाळे, वृषाली बागुल, डॉ. सोनिया बेलगावकर, राजीव मैंदीरता, मारूती काटे उपस्थित होते. आरटीई कायद्याअंतर्गत शिक्षक डीएड किंवा बीपीएड असावा. त्यांच्याकडे जर ही पदवी नसेल अथवा तो प्रशिक्षित नसेल, तर एनआयओएसअंतर्गत पंधरा दिवस चालणारे प्रशिक्षण घेणे व त्यास ७५ टक्के उपस्थिती अनिवार्य आहे. अन्यथा त्या शिक्षकास प्रशिक्षणाची परीक्षा देता येणार नाही, अशा जाचक अटी टाकल्या आहेत.पिंपरीतील एका महाविद्यालयात सुरू असलेल्या प्रशिक्षणास प्रत्येक शाळेतून एका वेळेस पाच ते सहा शिक्षकांना बोलविले आहे. शिक्षक सलग १५ दिवस उपस्थित राहिल्यास विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. प्रशिक्षण हे केवळ मराठीमध्ये असल्याने इंग्रजी माध्यमाच्या शिक्षकांना अडचणी येत आहेत. शिक्षण विभागाकडून कोणतीच माहिती पुरविली न गेल्यामुळे अनेक शिक्षकांना या प्रशिक्षणाची नोंद करता आलेली नाही. अशा पध्दतीने प्रशिक्षणासाठी असलेल्या जाचक अटी आम्हाला मान्य नाहीत. त्यामुळे आम्ही या प्रशिक्षणास विरोध करीत असून, प्रशिक्षणास शिक्षकांना पाठवणार नाही, अशी भूमिका असोसिएशनच्या वतीने धर्माधिकारी यांनी ‘लोकमत’शी बोलताना मांडली.आॅनलाइनची मागणी- प्रशिक्षण हे शैक्षणिक कालावधीत न ठेवता शालेय सुटीच्या काळात किंवा साप्ताहिक सुटी (शनिवार, रविवार) दिवशी घ्यावे .- प्रशिक्षण मराठीसह इंग्रजीत द्यावे.- प्रशिक्षण व्हिडीओ माध्यमातून दिले जाते. हे व्हिडीओ संस्थेच्या संकेतस्थळावरही उपलब्ध- हे प्रशिक्षण आॅनलाइन माध्यमातून आखून त्यानंतर परीक्षा देण्याची मुभा द्यावी.

टॅग्स :Schoolशाळाpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड