गद्दारांनी गालबोट लावले त्यांना धडा शिकवणे गरजेचे; अजित पवारांचा कलाटेंवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2023 04:12 PM2023-02-13T16:12:43+5:302023-02-13T16:12:52+5:30

चिंचवडमधील बंडखोरी रोखण्यात यश आले नाही म्हणून काहीही फरक पडत नाही

Traitors taunted they need to be taught a lesson Ajit Pawar targets rahul Kalate | गद्दारांनी गालबोट लावले त्यांना धडा शिकवणे गरजेचे; अजित पवारांचा कलाटेंवर निशाणा

गद्दारांनी गालबोट लावले त्यांना धडा शिकवणे गरजेचे; अजित पवारांचा कलाटेंवर निशाणा

googlenewsNext

पिंपरी : मागील चिंचवड विधानसभा निवडणूकीत अपक्षाला लाखांच्यावर मते पडली. ही मते तुझी आहेत का? अरे बेट्या मी राष्ट्रवादीचा उमेदवार उभा केला नाही, म्हणून मते मिळाली. बेडूक फुगल्यानंतर त्याला वाटत मीच फुगतोय. पण तसे नसत. बंडखोराचा बोलविता धनी कोण? असा प्रश्न विरोधीपक्षनेते अजित पवार यांनी चिंचवड येथे केली. चिंचवडचे आमदार नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत पवार बोलत होते

चिंचवड येथील महाविकास आघाडीच्या मेळाव्यात शिवसेना बंडखोर राहुल कलाटे यांचे नाव न घेता पवार यांनी टीका केली. पवार म्हणाले, ‘‘काहीजण उमेदवारी मागत होते, मी सर्व नेत्यांशी बोलून राष्ट्रवादीची उमेदवारी ठरविली. बंडखोरी होऊ नये, यासाठी प्रयत्न केले. उमेदवारी अर्ज माघारीच्या शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न केले. कसब्यातील काँग्रेसमधील बंडखोराने अर्ज मागे घेतला. मात्र, चिंचवडमधील बंडखोरी रोखण्यात यश आले नाही. त्यामुळे काहीही फरक पडत नाही. लढत भाजप आणि राष्ट्रवादीत होणार आहे. त्यामुळे कोणीही रूसू नका? फुगू नका नाराज होऊ नका. गद्दारांनी गालबोट लावले त्यांना धडा शिकविणे गरजेचे आहे. ’’

ज्यांचे निधन झाले त्यांना सगळ दिल त्यांनी सोडले

अजित पवार यांनी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्यावर टीका केली. पवार म्हणाले, ‘‘ही निवडणूक भावनिक नाही. ज्यांचे निधन झाले. त्यांना नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, महापौर, विधानपरिषदेवर अपक्ष आमदार, चिंचवडविधानसभेत अपक्ष आमदार म्हणून निवडूण आणल. मी ताकद दिली. ते आम्हाला सोडून गेले. ते आजारी असताना सगळ विसरून त्यांना इंजेक्शनसाठी मदत केली. मात्र, भाजपा हा पक्ष किती स्वार्थी आहे ते पहा. लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक आजारी असतानाही त्यांना राज्यसभेच्या मतदानासाठी बोलावलं. जीव धोक्यात घालून ते मतदानास गेले. ए्नाद दोन मते नसती पडली तरी आकाश कोसळल नसत.’’

दादा म्हणाले गप्प बसा नाहीतर मी बाहेर काढेन

महाविकास आघाडीच्या मेळाव्यात कार्यकर्त्यांचा गोंधळ करीत होते. त्यामुळे अजित पवार यांचा आवाज येत नव्हता. त्यावर अजित पवार संतापले, ‘‘ए मागून एक आवाज काढू नका. नका गप्प बसा. नाही तर बाहेर काढेन.’’ त्यानंतर शांतता पसरली.

Web Title: Traitors taunted they need to be taught a lesson Ajit Pawar targets rahul Kalate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.