पिंपरी : शहरातील दोन पोलिस निरीक्षकांच्या बदल्या झाल्या. पिंपरी - चिंचवड पोलिसआयुक्तालयांतर्गत या बदल्या झाल्या. याबाबतचे आदेश मंगळवारी (दि. २) रात्री उशिरा देण्यात आले.
गुन्हे शाखेच्या पीसीबी/ एमओबी विभागाचे पोलिस निरीक्षक बाळकृष्ण सावंत यांची दरोडा विरोधी पथक प्रमुख म्हणून बदली झाली. तर आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत पोलिस निरीक्षक अनिल देवडे यांची गुन्हे शाखेच्या पीसीबी/ एमओबी विभागात बदली झाली.
पिंपरी-चिंचवड पाेलिस आयुक्तालयाची नवीन वर्षाची सुरुवात अंतर्गत बदल्यांनी झाली आहे. दरम्यान, आयुक्तालयांतर्गत काही पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, वाहतूक विभागात पोलिस निरीक्षक पदे रिक्त आहेत. भोसरी, एमआयडीसी भोसरी, देहूरोड या पोलिस ठाण्यांमध्ये पोलिस निरीक्षक (गुन्हे) पदे रिक्त आहेत. गुन्हे शाखा युनिट चार, युनिट पाच, सायबर शाखेसाठी देखील पोलीस निरीक्षक नाहीत.
वाहतूक शाखेला बळ मिळेल का?
पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेतही पोलिस निरीक्षक पदे रिक्त आहेत. तळवडे वाहतूक विभाग, तळेगाव वाहतूक विभाग, हिंजवडी वाहतूक विभाग, बावधन वाहतूक विभागाची मदार सहायक पोलिस निरीक्षकांवर आहे. रिक्त पदांवर निरीक्षकांची नियुक्ती करून वाहतूक शाखेला बळ देण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे आगामी काळात आणखी अंतर्गत बदल्या होण्याची शक्यता आहे.