- विशाल शिर्केपुणे - पोलिसांच्या वाहतूक शाखेने शहर आणि द्रुतगती मार्गावरील प्राणघातक अपघातांची ३६ ठिकाणे (ब्लॅक स्पॉट) निश्चित केली असून, त्यात सर्वाधिक नऊ ठिकाणे ही मुंबई-बेंगळुरु महामार्गावरील आहेत. विशेष म्हणजे केवळ ब्लॅक स्पॉट निश्चित करण्यावर न थांबता वाहतूकशाखेने त्यावरील उपायदेखील महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्प अधिका-यांना सुचविले आहेत.केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी देशातील अपघातांची संख्या निम्म्यावर आणण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याची सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर शहर आणि शहर हद्दीलगतच्या महामार्गावरील ३६ अपघातप्रवण क्षेत्र निश्चितकरण्यात आले होते. ज्या ठिकाणी मागील तीन वर्षांत पाच अथवा त्याहून अधिक जीवघेणे अपघात झाले आहेत अशा ठिकाणांचा यात समावेश केला आहे.राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, महापालिका, परिवहन विभाग आणि वाहतूक शाखेच्या समन्वयातून अपघातांची संख्या कमी करण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येत आहेत. महामार्गावरील अपघातात सर्वाधिक मृत्यू व गंभीर जखमी हे दुचाकीस्वार व पादचारी आहेत. महामार्गावर जड वाहनांच्या धडकेमुळे दुचाकीस्वारांचा मृत्यू होत आहे, तर रस्ता ओलांडताना पादचाºयांना एकामागून एक येणाºया वाहनांचा अंदाज येत नाही.महामार्गावरील अपघात रात्री व पहाटे अपघातांची संख्या सर्वाधिक असल्याचे निरीक्षण वाहतूक शाखेने केले आहे. पादचारी पूल, रस्त्याचा आकार वाढवून वळण कमी करणे, दुभाजक करणे, असे उपाय वाहतूक शाखेने सुचविले आहेत.वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त अशोक मोराळे आणि अधीक्षक अभियंता राजेंद्र राऊत यांनी संयुक्तरीत्या काही अपघातप्रवण रस्त्यांची पाहणी केली. त्यात वाकड, सूस ब्रिज, हिंजवडी येथील अपघातांबाबतही वाहतूक पोलिसांनी काही उपाय सुचविले असल्याची माहिती विवेकानंद वाखारे यांनी दिली.शहरातील ब्लॅक स्पॉटमुंबई-बेंगळुरु रस्त्यावर सर्वाधिक ९ जीवघेणे अपघात प्रवणक्षेत्र आहेत. औंध हॉस्पिटल-सांगवी, विशल नगर-सांगवी, जगताप डेअरी चौक-वाकड, बालेवाडी स्टेडियम-हिंजवडी, वाकड, बावधन आणि पुनावळे ब्रिज, भूमकर चौक, बालेवाडी स्टेडियम-हिंजवडी, धावडे वस्ती, नाशिक फाटा, सीएमई बोपोडी-भोसरी, भक्ती शक्ती चौक-निगडी, दिघी मॅगझीन, एमआयटी कॉलेज-दिघी.त्याव्यतिरिक्त करीष्मा चौक-कोथरुड, वाळवेकर चौक-सातारा रस्ता, कात्रज चौक-भारती विद्यापीठ, जेधे चौक-स्वारगेट, डायस प्लॉट(स्वारगेट), गंगाधाम चौक-मार्केटयार्ड, फुरसुंगी रेल्वे पूल-हडपसर, रामटेकडी चौक सोलापूर हायवे-वानवडी, उंड्री चौक-कोंढवा, खडीमशिन चौक-कोंढवा, तेलाची मोरी-विमानतळ, खराडी बायपास-विमानतळ, हयात हॉटेल येरवडा, सादलबाबा चौक-येरवडा, संगमवाडी बस पार्कींक येरवडा, मुठा नदीपुल-वारजे, माई मंगेशकर हॉस्पिटल-वारजे, डुक्कर खिंड-वारजे, वडगाव ब्रिज-सिंहगड रस्ता, नवले ब्रिज-सिंहगड रस्ता,विप्रो सर्कल फेज-टू : येथे आयटी क्षेत्रातील वाहतूक मोठ्या प्रमाणावर असते. त्यामुळे सकाळी आणि सायंकाळी येथे मोठी गर्दी होते. येथील अनेक कर्मचारी सहा आसनी रिक्षा अथवा बसमधून प्रवास करुन, पायी रस्ता पार करतात. त्यांच्या व पादचाºयांच्या सोयीसाठी येथे पूल बनविणे गरजेचे आहे.
ब्लॅक स्पॉटवर उपचार! अपघात रोखण्यासाठी संयुक्त पाहणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 06, 2018 3:08 AM