शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायली नागरिक अचानक भारत सोडून जाऊ लागले; पर्यटनाचे बुकिंग रद्द, विमाने फुल
2
"एकनाथ शिंदे दावोसमध्ये हॉटेलचं बिल न देताच..." जयंत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना खोचक टोला
3
'सुप्रिया सुळेंना फुकटचं खायची सवय, १५०० दिले तर पवारांच्या...', भाजप आमदाराची टीका
4
Smart SIP Vs Regular SIP : स्मार्ट आणि रेग्युलर SIP मध्ये फरक काय, ५००० रुपयांतून २३ लाखांची होईल अधिक कमाई; कशी?
5
"सिंचन घोटाळा झाल्याचं पंतप्रधान मोदींनीच कबूल केलं"; पृथ्वीराज चव्हाणांनी अजित पवारांना पुन्हा डिवचलं
6
शाळेतून परतणाऱ्या मुलींची छेड काढणाऱ्यांचा 'हाफ एन्काऊंटर'; आरोपींचा पोलिसांवर गोळीबार
7
Suraj Chavan : १४ लाख अन् १० लाखांचा व्हाऊचर आणि..., बिग बॉस जिंकल्यानंतर सूरज चव्हाणला किती रुपये मिळाले?
8
'तो जिंकला अन् १ तासात गाणं तयार केलं', उत्कर्ष शिंदेने बनवलेलं सूरज चव्हाणवरचं धमाकेदार गाणं ऐकाच
9
अमेरिकेच्या अ‍ॅडवायझरीनंतर कराची विमानतळाबाहेर बॉम्बस्फोट; दोन परदेशी नागरिकांचा मृत्यू
10
छत्रपतींचे स्मारक कधी होणार? संभाजीराजेंचे टार्गेट भाजप; अरबी समुद्रात शिवस्मारक शोध आंदोलन
11
ओलाच्या सर्व्हिसवरून कुणाल कामरा-भाविश अग्रवाल भिडले; लोकांनी मालकाला आरसा दाखविला...
12
"शिवसेना वाढण्यासाठी हजारो शिवसैनिकांच्या हत्या"; रामदास कदमांचे वक्तव्य, म्हणाले "उद्धव ठाकरेंना याची..."
13
आजचे राशीभविष्य ७ ऑक्टोबर २०२४; धनलाभ होईल, येणारी बातमी...
14
“स्मारकाविरोधात कोर्टात जाणारे कोण तेही बघा”; देवेंद्र फडणवीसांचा संभाजीराजेंवर पलटवार
15
'त्या' सगळ्यांना पुन्हा पक्षात प्रवेश देणार: ठाकरे, शिंदेसेनेचे माजी नगरसेवक उद्धवसेनेत
16
“हिऱ्याच्या पोटी गारगोटी, मुलाशी का, बापाशी भिडा”; CM एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना आव्हान
17
“लोकसभेची गणिते वेगळी होती, मनसेबाबत महायुतीचे वरिष्ठ नेते निर्णय घेतील”: श्रीकांत शिंदे
18
मराठी अभिजात भाषा झाली तरी जल्लोष का नाही?: राज ठाकरे, पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
19
चांगल्यांचा सन्मान अन् वाईटांना शिक्षा करीत नाही ते म्हणजे सरकार: नितीन गडकरी
20
चेंबूरमध्ये अग्नितांडव, दुकानातील रॉकेलच्या साठ्याचा भडका; एकाच कुटुंबातील ७ जणांचा मृत्यू

समस्येवर वेळीच उपचार व्हावा

By admin | Published: February 23, 2017 2:43 AM

विद्यार्थ्यांना समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. कोणतीही समस्या गंभीर न होऊ देता

पिंपरी : विद्यार्थ्यांना समस्या असल्यास त्यांनी समुपदेशकाचा सल्ला घ्यावा. कोणतीही समस्या गंभीर न होऊ देता वेळीच उपचार करणे योग्य ठरते. समुपदेशकाचा सल्ला घेण्यासाठी जाण्याची वेळ आली म्हणजे वेड लागणे नव्हे. ही गोष्ट विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी, असे मत मानवी शिक्षण संस्थेचे डॉ. सी. जी. देशपांडे यांनी व्यक्त केले.प्रौढ निरंतर शिक्षण आणि ज्ञानविस्तार विभाग सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, मानवी शिक्षण संस्था आणि पुणे जिल्हा शिक्षण मंडळाचे प्रा. रामकृष्ण मोरे महाविद्यालय (आकुर्डी) येथील मानसशास्त्र विभागाच्या वतीने विवाहपूर्व व समस्या निवारण समुपदेशन शिबीराचे आयोजन करण्यात आले. त्या वेळी डॉ. देशपांडे बोलत होते.डॉ. मेधा कुमठेकर, डॉ. डी. जी. दरेकर, प्राचार्य डॉ. नितीन घोरपडे, उपप्राचार्य डॉ. तुषार शितोळे उपस्थित होते. समुपदेशक म्हणून प्रा. शरदचंद्र बोटेकर (खडकी), प्रा. विष्णू खडाखडे,प्रा. अर्पिता सगर (सोलापूर), प्रा. ज्योत्स्ना पालेकर, डॉ. रेखा साळुंके,प्रा. वीणा महाजन (जळगाव), डॉ. नेहा शुक्ला (ठाणे), डॉ. मीनल देशमुख (सावदा),प्रा. शुभांगी साळवी(पुणे) उपस्थित होते. डॉ. दरेकर म्हणाले, विद्यार्थ्यांच्या या वयात अनेक समस्या असतात. पे्रम ही भावना काय आहे हे नक्की समजत नाही. तेवढा समंजसपणा आलेला नसतो. म्हणून प्रेम करा व अभ्यासावर करा. डॉ. कुमठेकर म्हणाल्या, सर्वांना समस्या असतात. समस्यांशिवाय जीवन म्हणजे मिठाशिवाय जेवण. त्यामुळे समस्यांमुळे घाबरून न जाता त्या सोडविण्याचा प्रयत्न करणे आवश्यक असते. काही समस्या सोडविण्यासाठी समुपदेशकांकडेच जाणे उचित ठरते.लहानपणी घडलेल्या गोष्टींचा परिणाम आपल्यावर होत असतो. त्यामुळे अनेकदा अनेक समस्यांचे मूळ हे लहानपणीच्या आपल्या जीवनावर असते. विद्यार्थ्यांनी याचा जरूर विचार करून या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन डॉ. घोरपडे यांनी केले. प्राचार्य डॉ. घोरपडे यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन प्रा. सुवर्णा शिंदे यांनी तर आभारप्रदर्शन प्रा. बी. के. पावसे यांनी केले. शिबीराचा एकूण ४२ लाभार्थींनी लाभ घेतला. त्यांना जाणवणाऱ्या अनेक प्रकारच्या वैयक्तिक, कौटुंबिक, शैक्षणिक, वैवाहिक, व्यावसायिक समस्यांवर समुपदेशन करण्यात आले.(प्रतिनिधी)