पिंपरी : निगडी, प्राधिकरणात एक मोटार उभी होती. दंड आकारण्यासाठी वाहतूक पोलिसांना चलन मशिन आल्या आहेत. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा क्रमांक घेऊन तो चलन मशिनमध्ये टाकून दंडाची पावती संबंधित वाहनचालकाला घरी पाठवली जाते.
निगडी वाहतूक शाखेच्या पोलीस कर्मचाºयाने दुचाकीवरून ट्रिपल सिट जाणाºया एका दुचाकीचा क्रमांक मशिनमध्ये टाकताना, डीएल ऐवजी सीएल अशी चुकीची माहिती फीड केली. दुचाकीला आकारण्यात येणाºया दंडाची पावती चुकीच्या नोंदीमुळे चक्क महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे पोहोचली. दुचाकीच्या दंडाची पावती चारचाकी वाहन मालकाला गेल्याने वाहतूक पोलिसांचा गोंधळी कारभार उघडकीस आला.
महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडील चारचाकी मोटारीचा क्रमांक (एमएच १४ सीएल १५९९) असा आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करून जात असलेल्या दुचाकीचा क्रमांक आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या मोटारीचा क्रमांक मिळता जुळता आहे. नोंदणी क्रमांकातील डीएल ऐवजी सीएल असे वाहतूक पोलिसाने नजरचुकीने चलन मशिनमध्ये फीड केले. आपल्या हातून काय चूक झाली, हे त्या वेळी त्यांच्या लक्षात आले नाही. मात्र दुचाकीवरील ट्रिपल सिटसाठी महापालिका आयुक्तांच्या मोटारीला २०० रुपये दंड आकारल्याची पावती आयुक्तांच्या निवासस्थानी पोहोचली.
त्या वेळी चार चाकी मोटारीतून तीन व्यक्तींनी प्रवास करणे नियमबाह्य कसे ठरू शकते, असा मुद्दा उपस्थित झाला. हा दंड आपल्या मोटारीसाठी आकारण्यात आला नसून, वाहन क्रमांकामध्ये साधर्म्य असलेल्या दुसºया वाहनासाठी आकारण्यात आला असावा, चुकीने आपल्याकडे दंडाची पावती पाठवली. ही बाब आयुक्त हर्डीकर यांच्या वाहनचालकाच्या लक्षात आली. याबद्दल त्यांनी निगडी वाहतूक पोलिसांना कळविले. त्या वेळी आपल्या हातून गंभीर चूक झाल्याचे वाहतूक पोलिसाच्या लक्षात आले.चुकीबद्दल आयुक्तांची मागितली माफीडीएल ऐवजी सीएल झाल्याने आयुक्तांना मनस्ताप झाला असावा, म्हणून संबंधित कर्मचाºयाने या प्रकाराबद्दल माफी मागितली. नजरचुकीने हे घडले असल्याची कबुली दिली. त्यात सुधारणा करून देण्याची तयारीही दाखवली. छोटीशी चूक किती महागात पडू शकते, याचा धडा मिळाला असून, यापुढे अधिक दक्षता घेऊन काम करण्याचा निश्चय पोलीस कर्मचाºयाने केला.