पिंपरी : तुकाराम बीजनिमित्ताने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या दर्शनासाठी दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक देहूगाव येथे येतात. पीएमपीएमएलकडून २६ ते २८ मार्च दरम्यान देहूगावसाठी जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
पुणे व पिंपरी-चिंचवड शहर तसेच उपनगरांतून तुकाराम बीजनिमित्ताने मोठ्या संख्येने भाविक देहूगाव येथे येतात. या वर्षी बुधवारी (दि. २७) तुकाराम बीज असल्याने नागरिकांना देहूगाव येथे जाण्यासाठी स्वारगेट, हडपसर, पुणे स्टेशन, महापालिका, निगडी या ठिकाणांवरून २६ ते २८ मार्चदरम्यान जादा बसेस सोडण्यात येणार आहेत.
देहूगाव येथून परतीच्या प्रवासासाठी झेंडे मळ्याजवळ मिलिटरी परिसरातील मोकळ्या जागेत परिवहन महामंडळाचे तात्पुरते बसस्थानक उभारण्यात आले असून, तेथून जादा बसेस सुटणार आहेत. देहूगाव ते आळंदी दर्शन जाण्याकरिता देहूगाव-आळंदी रस्त्यावर गाथा परिसरातील जगद्गुरू संत तुकाराम महाराज क्रीडांगणाजवळील गायरानाच्या मोकळ्या जागेतून जादा बसेस सोडण्यात येतील.
येथून सुटणार जादा बस १. स्वारगेट ते देहूगाव२. मनपा भवन ते देहूगाव३. मनपा भवन ते आळंदी४. स्वारगेट ते आळंदी५. हडपसर ते आळंदी६. पुणे स्टेशन ते देहूगाव७. निगडी ते देहूगाव८. देहूगाव ते आळंदी