पिंपरी : महापालिका निवडणूक फेब्रुवारीत झाली अन् काही दिवसांतच कार्यकर्ते अडचणीत आले आहेत. निवडणुकीत पराभूत झालेल्यांनी परिसरातील ज्या कार्यकर्त्यांनी आपले काम न करता, प्रतिस्पर्धी उमेदवाराचे काम केले, त्या कार्यकर्त्यांना लक्ष्य केले आहे. काही ठिकाणी मारहाणीचे प्रकार घडू लागले आहेत, तर निवडणुकीनंतरची परिस्थिती कार्यकर्त्यांच्या जीवावर बेतणारी ठरू लागली आहे. खराळवाडी, गांधीनगर परिसरातील सुहास हळदणकर या कार्यकर्त्याचा सिमेंट ब्लॉक डोक्यात मारून खून झाला. निवडणुकीतील वातावरणच या खुनाच्या घटनेस कारणीभूत ठरल्याचे बोलले जात आहे. निवडणुकीच्या तोंडावर काही कार्यकर्त्यांनी प्रभागातील नागरी प्रश्नांवर आवाज उठविला होता. विद्यमान लोकप्रतिनिधी प्रभागातील विकासकामे करण्यास कमी पडले, हे जनतेला दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. पिंपरी गाव, रहाटणी तसेच भोसरी परिसरात हाच का विकास? अशा प्रकारचे फलक झळकले होते. व्हॉट्सअॅपवर प्रभागातील विकासकामांच्या दर्जाबद्दल कमेंटस टाकल्या जात होत्या. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत प्रचारात सहभागी होणारे कार्यकर्ते निवडणुकीनंतर कोणाचे टार्गेट होत नाहीत. (प्रतिनिधी)असुरक्षित वातावरणकाही नगरसेवक संबंधित कार्यकर्त्यापुढे त्याने आपले काम न केल्याचे बोलून उघडपणे दाखवितात. तर काही जण सूडबुद्धीने वागणूक देतात. अशा कार्यकर्त्यांना धडा शिकवायचा असे ठरवून ते अन्य कार्यकर्त्यांच्या माध्यमातून त्यांच्यात कायम धूसपूस सुरू ठेवतात. त्याची परिणीती हाणामारित आणि खुनाच्या घटनांमध्ये दिसून येते.
निवडणुकीनंतर कार्यकर्ते अडचणीत
By admin | Published: April 14, 2017 4:23 AM