वडगाव मावळ : खून व दरोड्यातील कर्जत जामखेड जेलमधून पळून गेलेले दोन आरोपी वडगाव पोलिसांनी सापळा रचून पकडले. मोहन कुंडलीक भोरे( वय ३६ रा.कवडगाव ता.जामखेड), जि. अहमदनगर) व ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे (वय २५ रा.जवळा ता.जामखेड जि.अहमदनगर )अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे, गंगाधर लक्ष्मण जगताप, अक्षय रामदास राऊत, मोहन कुंडलीक भोरे, चंद्रकांत महादेव राऊत या पाच आरोपींनी नगर जिल्ह्यात खून, बलात्कार, जबरी चोरी व लुटमारीचे गुन्हे केले होते. या प्रकरणी पाचही जण २०१८ पासून कर्जत जेलमध्ये होते. रविवारी (दि.९ फेब्रुवारी ) जेलच्या छताचे पत्रे उचकटून पाचही जण पळून गेले होते. या घटनेमुळे पोलिस दलात राज्यात खळबळ उडाली होती.
अखेर वडगाव मावळ पोलिसांना यश... यातील आरोपी मोहन कुंडलीक भोरे व ज्ञानेश्वर तुकाराम कोल्हे हे वडगाव मावळ येथे नातेवाईकांकडे येणार असल्याची माहिती वडगाव पोलिसांना मिळाली. पोलिस निरीक्षक सुरेश निंबाळकर उपनिरीक्षक दिलीप देसाई, सहाय्यक फौजदार रविराज पाटोळे, विश्वास आंबेकर, मनोज कदम, श्रीशैल कंटोळी, रविंद्र रॉय, प्रविण विरणर, गणेश तावरे, संदिप घोटकर यांनी मंगळवारी रात्री वडगाव येथील म्हाळसकर वस्ती येथील लोटस संकुल येथे पोलिस बसले. पोलिसांना पाहताच पळू लागले पोलिसांनी पाठवलाग करून दोघांना मोटारसायकल सह ताब्यात घेतले. पुढील कार्यवाही करिता अहमदनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.
ाायी अध्यक्षपद