पिंपरी : विनापरवाना पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या दोघांना चिंचवड पोलिस ठाण्याच्या हद्दीत अटक केली. अटक केलेल्या आरोपीचे नाव रोहित ऊर्फ येशू दत्ता धावरे (वय- १९), अजय शंकर राठोड (रा. पांडवनगर) असे आहे. आरोपी अजय राठोड याला न्यायालयाने कोठडी सुनावली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि.२९) आरोपी अजय राठोड याच्याकडे ३४ हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल तसेच ७०० रुपये किमतीचे एक काडतूस मिळून आले. याप्रकरणी पोलिस अंमलदार पंकज भदाणे यांनी सोमवारी (दि. ३०) चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. तर, आरोपी रोहित ऊर्फ येशू धावरे याच्याकडे सोमवारी (दि. ३०) गावठी बनावटीचे ३५ हजार रुपये किमतीचे पिस्तूल तसेच ७०० रुपयांचा एक राऊंड मिळून आला. पोलिसांनी रोहित याला अटक केली आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकातील पोलिस अंमलदार सदानंद विजय रुद्राक्षे यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती.