शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

जामिनावर सुटायचे अन् घरफोडी करायचे ; सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्या भावांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2021 7:13 PM

३० लाख ६०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, तीन टीव्ही, पाच चारचाकी वाहने, चार दुचाकी हस्तगत

ठळक मुद्देपिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा, विरोधी पथकाने केली ही कारवाई

पिंपरी : दरोड्याच्या तयारीच्या प्रयत्नातील सराईत गुन्हेगार असलेल्या दोन सख्ख्या भावांना पोलिसांनी अटक केली. घरफोडीचे १२ तर वाहनचोरीचे आठ गुन्हे उघडकीस आले असून त्यांच्याकडून ३० लाख ६०० रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम, तीन टीव्ही, पाच चारचाकी वाहने, चार दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलिसांनी वेळोवेळी अटक करूनही आरोपी जामिनावर सुटून पुन्हा घरफोडी व इतर गुन्हे करीत असल्याचे तपासातून समोर आले आहे. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या दरोडा, विरोधी पथकाने ही कारवाई केली.  

सुरजितसिंग राजपालसिंग टाक (वय ३२), जितसिंग राजपालसिंग टाक (वय २६, दोघे रा. हडपसर, पुणे), असे अटक केलेल्या सख्ख्या भावांचे नाव आहे. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी दिलेल्या माहितीनुसार,  आरोपी सुरजितसिंग व जितसिंग हे दोन्ही इंद्रायणीनगर येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना मिळून आले. २३ जानेवारी रोजी त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडे चाैकशी केली असता, साथीदारांसह त्यांनी पिंपरी-चिंचवड, पुणे शहर व ग्रामीण भागात घरफोडी व वाहनचोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. आरोपी हे सराईत गुन्हेगार असून, ते टोळीने गुन्हे करतात. गुन्हे करण्यासाठी ते चोरीच्या वाहनांचा वापर करीत होते. चारचाकी वाहन चोरून ते १० ते २० किलोमीटरवर एका ठिकाणी पार्क करीत. त्यानंतर चोरीच्या दुचाकीने त्याठिकाणी जाऊन चोरीच्या चारचाकी वाहनातून घरफोडी किंवा गुन्हे करण्यासाठी जात. घरफोडी करून झाल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी चारचाकी पार्क करून तेथील दुचाकीने चोरीचा मुद्देमाल घेऊन निघून जात.

पिंपरी-चिंचवड शहरातील देहूरोड, पिंपरी, भोसरी, चिंचवड, सांगवी, भोसरी एमआयडीसी, निगडी, चिखली, दिघी, वाकड या पोलीस ठाण्यांतील तसेच म्हाळुंगे पोलीस चाैकीत दाखल विविध १७ गुन्हे उघडकीस आले आहेत. तसेच पुणे शहरातील बंडगार्डन व खडकी पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, असे दोन गुन्हे तर पुणे ग्रामीणमधील लोणी काळभोर व मंचर पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक, असे एकूण २१ गुन्हे उघडकीस आले आहेत.दरोडा विरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम तांगडे, तांत्रिक विश्लेषण विभागाचे पोलीस निरीक्षक संजय तुंगार, उपनिरीक्षक मंगेश भांगे, यांच्या पथकाने ही कामगिरी केली. या पथकाला ५० हजारांचे बक्षीस पोलीस आयुक्तांनी जाहीर केले आहे.

आरोपी भावांवर ४८ गुन्हे दाखलआरोपी सुरजितसिंग आणि जितसिंग यांच्यावर दरोड्याचा प्रयत्न, घरफोडी व वाहनचोरी अशा स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. सुरजितसिंग याच्यावर पिंपरी, येरवडा, हडपसर, कोथरुड, खडकी, एमआयडीसी भोसरी, लोणीकंद, दत्तवाडी, सांगवी, डेक्कन, फरासखाना व चिखली या पोलीस ठाण्यांमध्ये एकूण २५ गुन्हे दाखल आहेत. जितसिंग याच्यावर कोथरुड, सिंहगड, हडपसर, डेक्कन, मुंढवा, दत्तवाडी, वानवडी, वारजे माळवाडी, भोसरी पोलीस ठाण्यात एकूण २३ गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमध्ये दोन्ही आरोपींना वेळोवेळी अटक करण्यात आली. मात्र जामिनावर सुटून पुन्हा त्यांच्याकडून असे गुन्हे होत असल्याचे समोर आल्याचे पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांनी सांगितले.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडThiefचोरtheftचोरीPoliceपोलिसArrestअटक