शहरं
Join us  
Trending Stories
1
Badlapur Sexual Assault Case: मोठी बातमी! बदलापूर प्रकरणी शाळेच्या ट्रस्टींना झटका; कोर्टाने अटकपूर्व जामीन नाकारला
2
'जज्बा'! रोहित अँण्ड कंपनीनं अशक्य ते शक्य करून दाखवलं; कानपूरमध्ये टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय
3
"लव्ह जिहाद, व्होट जिहाद म्हणून फडणवीस यांनी केला समतेच्या मूल्याचा अपमान, जाहीर माफी मागा’’, काँग्रेसची मागणी 
4
जय शाहांचा वारसदार कोण होणार? BCCI सचिव पदासाठी आशिष शेलारांसह 'ही' ४ नावं चर्चेत
5
धक्कादायक! वाराणसीमधील १० मंदिरांमधून हटवली साईबाबांची मूर्ती, समोर आलं असं कारण
6
"तुम्ही लोक एखाद्याला...", पत्रकाराचा 'तो' प्रश्न ऐकताच पाकिस्तानी खेळाडू इफ्तिखार संतापला!
7
Zerodha नं गुंतवणूकदारांना दिली आनंदाची बातमी, ब्रोकरेज चार्जवर केली मोठी घोषणा
8
“गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहिणीला १५०० रुपये मिळाले असते का?”: शहाजीबापू पाटील
9
डिजिटल अरेस्ट म्हणजे काय? काही क्षणात तुम्हाला करतात कंगाल!
10
महाराष्ट्रातून धावणारी वंदे भारत बंद होणार? ८० टक्के जाते रिकामी, अलीकडेच झाली होती सुरु
11
दुधाचा चहा ठरू शकतो 'या' जीवघेण्या आजारांसाठी कारणीभूत?; ICMR चा धक्कादायक रिपोर्ट
12
धक्कादायक! शाळेच्या बसने अचानक घेतला पेट; 25 विद्यार्थी-शिक्षकांचा होरपळून मृत्यू
13
"द्वेषाच्या राजकारणाला बळी पडल्यामुळं माझ्या पत्नीनं जमीन परत करण्याचा निर्णय घेतला", मुख्यमंत्री सिद्धरामय्यांचा दावा 
14
Loan घेण्यासाठी महत्त्वाचा असतो CIBIL Score आणि Credit Score; तुम्हाला दोघांतला फरक माहितीये का?
15
कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी संबंधित MUDA घोटाळ्याप्रकरणी कारवाई सुरू, लोकायुक्त पथक वादग्रस्त जमिनीवर पोहोचले
16
मूर्ती लहान पण कीर्ती महान! यशस्वीनं मोडला ५० वर्षांहून अधिक काळ अबाधित असणारा गावसकरांचा विक्रम
17
शिंदेंच्या जिल्हाप्रमुखांवर झाडल्या गोळ्या, पोलीस आले म्हणून वाचला जीव; काय घडला थरार?
18
'मंदिर असो वा दर्गा, बेकायदेशीर बांधकाम पाडणार', सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका
19
जय पवार की अजित पवार, बारामतीतून कोण लढणार? प्रदेशाध्यक्षांनी गोंधळ संपवला
20
"दिघेंच्या शेवटच्या क्षणी शिंदे, शिरसाट तिथे होते..."; ठाकरे गटातील नेत्याचा मोठा दावा

पिंपरीत माजी सैनिकाची दोन लाखांची फसवणूक

By admin | Published: July 15, 2017 1:39 AM

मिलिटरीच्या इलेक्ट्रॉनिक रिसर्च सेंटरचे रिटेंडरिंगचे काम माझ्याच हातात आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : मिलिटरीच्या इलेक्ट्रॉनिक रिसर्च सेंटरचे रिटेंडरिंगचे काम माझ्याच हातात आहे. त्यासाठी लागणारी एक मशिन दिल्लीवरून घ्या, असे सांगत एकाने उद्यमनगर येथील माजी सैनिकाची दोन लाख रुपयांना फसवणूक केली आहे. शिवचंद्र व्यंकटराव चिटणीस (वय ८४, रा. राधाकृष्ण कॉलनी, जळगाव) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरीगाव येथील विजय दिगंबर वराडे (वय ४५, रा. उद्यमनगर, पिंपरी) यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, त्यांच्या फिर्यादीनुसार मिलिटरीचे इलेक्ट्रॉनिक रिसर्च सेंटरचे फेरनिविदेचे काम माझ्याच हातात आहे, असे सांगत मी तुम्हाला ते काम देतो. त्यासाठी तुम्ही दिल्लीहून रिलीज होणारे बॉम्ब इलेक्ट्रिक सर्किट चेक करण्याचे मशिन घ्यावे लागेल. ते मशिन दिल्ली येथे मिळेल. तुम्ही माजी सैनिक आहात. त्यामुळे तुम्हाला काम लगेच मिळेल, असे सांगत मशिनसाठी दोन लाख सहा हजार रुपये रोख भरावयास सांगितले. त्याप्रमाणे विजय यांनी त्यासाठी दोन लाख रुपये दिले. आरोपी शिवचंद्र याने ती रक्कम पोहोचल्याची रिफंडेबल डिपॉझिट बनावट पावती दिली. हा फसवणुकीचा प्रकार सप्टेंबर २०१६ पासून सुरू होता. याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.