पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात आठवड्याभरात स्वाइन फ्लूमुळे तिघांचा बळी गेला असताना मंगळवारी पुन्हा स्वाईनफ्ल्यूचे ३ रुग्ण आढळले. यामुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. शहरात स्वाइन फ्लूने पुन्हा डोके वर काढले असून, एकाच आठवड्यात एकापाठोपाठ एक घडलेल्या घटनांमुळे स्वाइन फ्लूबद्दलची भीती पुन्हा पसरू लागली आहे. १ जानेवारीपासून अद्यापपर्यंत केलेल्या रुग्णांच्या तपासणीत एकूण ११ स्वाईन फ्ल्यूचे रुग्ण आढळले असून १ हजार २४६ जणांना टॅमी फ्लूच्या गोळ्या देण्यात आल्या आहेत. दरम्यान, आतापर्यंत स्वाइन फ्लूने तिघांचा मृत्यू झाला आहे. (प्रतिनिधी)
स्वाइन फ्लूचे आणखी दोन रुग्ण
By admin | Published: March 08, 2017 5:00 AM