शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
2
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
3
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
4
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
5
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
6
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
7
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
8
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
9
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
10
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
11
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या
12
गोरगरीब धारावीकरांना पक्के घर मिळू नये हीच राहुल गांधींची इच्छा; भाजपाचा घणाघाती आरोप
13
याला म्हणतात पैशांचा पाऊस...! ₹4 चा शेअर 4 महिन्यांत ₹282631 वर पोहोचला, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
मुंबई पोलिसांना मोठे यश! लॉरेंस बिश्नोईच्या भावाला अमेरिकेत अटक; भारतात आणणार
15
'छोटा पोपटने काँग्रेसला बरबाद केले', राहुल गांधींच्या 'सेफ' विधानावर भाजपचा पलटवार
16
मणिपूरमध्ये कोकोमीचे मोठे प्रदर्शन, सरकारी कार्यालयांना टाळे; आता सात जिल्ह्यांत इंटरनेट बंद करण्यात
17
“खरगेंच्या गावात सोयाबीनला ३८०० चा दर, काँग्रेस निवडणुकांनंतर आश्वासन विसरते”: फडणवीस
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'हसन मुश्रीफ गाडला जाणार', शरद पवारांसाठी बहीण सरोज पाटील मैदानात, विरोधकांवर हल्लाबोल
19
“लोकांचे प्रश्न सोडवायची धमक, पुढच्या पिढीची गरज, युगेंद्रला निवडून द्या”: शरद पवार
20
“२ लाखांच्या लीडने विजयी होतील, बारामतीकरांनी ठरवलेय की अजितदादांना CM करायचे”: जय पवार

वर्गणी दिली नाही म्हणून पिंपरीत दाेघांना बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: September 09, 2018 6:01 PM

गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली.

पिंपरी : गणेश उत्सवाची वर्गणी देण्यास नकार दिला म्हणून तीन जणांच्या टोळक्याने दोघांना बेदम मारहाण केली. तसेच भांडणे सोडवण्यास गेलेल्या एका वडापाव विक्रेत्यालाही जखमी केले.  ही घटना शुक्रवारी  रात्री आठच्या सुमारास रामनगर येथे घडली.  

    पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किसन गायकवाड, किरण विटकर, मयूर संजय विटेकर (वय १९, रा. शेलार चाळ, रामनगर, चिंचवड) अशी मारहाणीत जखमी झालेल्या तरुणांची नावे आहेत.  याप्रकरणी त्यांनी  पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली अाहे. वैभव माने (वय २२), रमजान शेख (वय १९, दोघे रा. दत्तनगर, चिंचवड) आणि त्याचा एक  साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

     मयूर याची रामनगर येथे राम मंदिरासमोर वडापावची हातगाडी आहे. शुक्रवारी रात्री आठच्या सुमारास आरोपी वैभव, रमजान आणि त्यांचा आणखी एक साथीदार वडापावच्या गाडीजवळ गणेश उत्सवाची वर्गणी मागण्यासाठी गेले होते. त्यावेळी मयूर याचा मित्र किसन गायकवाड आणि किरण विटकर हे दोघे गाडीजवळ थांबले होते. आरोपींनी किसन याच्याकडे गणपती उत्सवाची वर्गणी मागितली. त्यावरून आरोपी आणि किसन यांच्यामध्ये वाद सुरु झाले. वैभव याने गाडीवरील झारा उचलून किसनला मारहाण केली. रमजान आणि अन्य एका आरोपीने किरण याला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. भांडण सोडविण्यासाठी मयूर गेला असता वैभव याने बाजूला पडलेला सिमेंटचा गट्टू मयूरच्या डोक्यात मारला. या मध्ये मयूर गंभीर जखमी झाला. आरोपी अद्याप फरार आहेत. पिंपरी पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अन्सार शेख अधिक तपास करत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडGaneshotsavगणेशोत्सवnewsबातम्या