पवनानगर : मावळ तालुक्यातील पवना धरण परिसरात ब्राम्हणोली गावच्या हद्दीत पवना धरणावर जलविहारासाठी मित्रासमवेत आलेले दोन महाविद्यालयीन विद्यार्थी पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले. आज सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली.जितेश पगारे (वय १९, मूळचा रा. नाशिक, सध्या जेएसपीएम कॉलेज, कर्वेनगर, पुणे), अनिकेत निकम (वय २०, मूळ रा. साक्री, धूळे, सध्या सिंहगड कॉलेज, लोणावळा) अशी बुडालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची नावे आहेत. जितेश, अनिकेत व त्याचे इतर चार मित्र असे सहा जण पवना धरणावर फिरायला आले होते. सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास पाण्यात पोहताना व खेळताना जितेश व अनिकेत पाण्यात बुडाले असल्याचे समजले. त्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बालाजी गायकवाड, पोलीस कर्मचारी सुनिल गवारी, कमलेश घुले, लक्ष्मण रणसौरे यांनी घटनास्थळी धाव घेतली सोबत शिवदुर्ग मित्र या मदतकार्य करणाऱ्या संस्थेचे कार्यकर्ते यांनी धरण परिसरात बुडालेल्या मुलांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र अंधार पडल्याने शोध मोहिम थांबवण्यात आली. उद्या सकाळी साडेआठ वाजता पुन्हा शोध मोहिम राबविण्यात येणार आहे. (वार्ताहर)
पवना धरणामध्ये बुडाले दोन विद्यार्थी
By admin | Published: April 24, 2017 4:52 AM