पवनानगर: पवना धरणात दोन तरुण बुडाले आहेत. बुधवार (दि.०४) रोजी दुपारी १२:०० वाजण्याच्या सुमारास दुधिवरे (ता. मावळ) येथे ही घटना घडली. मयूर रविंद्र भारसाके (वय २५) तर तुषार रविंद्र अहिरे (वय.२६ दोघेही सध्या रा.पुणे, मुळ,रा.लालजैन मंदिराच्या पाठिमागे, पद्मावती नगर,वरणगांव,भुसावळ)असे बुडाल्या पर्यटकांची नावे असून ते बालेवाडी येथे एका खाजगी कंपनी मध्ये नोकरी करत होते.
लोणावळा ग्रामीण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बालेवाडी येथील स्केन रियालिटी प्राव्हेट लिमिटेड या खाजगी कंपनी मध्ये काम करणारे सुमारे आठ ते दहा मित्र पवना धरण परिसरात फिरण्यासाठी आले होते. यामधील दोघे जण दुधिवरे हद्दीतील पवनाधरणाच्या पाण्यात दुपारी ०४:०० वाजण्याच्या सुमारास पोहण्यासाठी उतरले होते. पोहताना त्यांना पाण्यातील खोलीचा अंदाज न आल्याने ते पाण्यात बुडाले आहेत. त्यांना वाचविण्यासाठी शिवदुर्ग रेस्क्यू टिमच्या वतीने धरणात बुडालेल्या दोन पर्यटकांचा शोध सुरू आहे. या घटनेची माहिती मिळताच लोणावळा ग्रामीणचे पोलीसानी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असून शोधकार्य सुरु आहे. तसेच पुढील तपास करत आहे.