पिंपरी : माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून आपल्याला काही विचारणा झाल्यास त्यांच्याकडे आपण स्पष्टीकरण देऊ, असे महापौर शकुंतला धराडे यांनी शनिवारी स्पष्ट केले. सभा तहकुबीच्या मुद्द्यावरून महापौर विरुद्ध राष्ट्रवादी असे चित्र निर्माण झाले आहे. यासह शुक्रवारी महापौरांनी अजित पवार यांचा फोन घेण्याचे टाळले, यावर स्पष्टीकरण देताना त्या बोलत होत्या. पिंपरी महापालिकेच्या शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सभा तहकुबीच्या मुद्द्यावरून गोंधळ झाला. पक्षादेश न पाळणाऱ्या महापौरांना बदलण्यासाठी राष्ट्रवादीकडून हालचाली सुरू झाल्या आहेत. याबाबत शुक्रवारी राष्ट्रवादीच्या शहर पदाधिकाऱ्यांची बैठकही झाली. तसेच रविवारी अजित पवार यांची भेट घेणार आहेत. (प्रतिनिधी)कोणाचाही फोन टाळलेला नाही. मोबाइल कंपनीच्या जाहिरातीचा फोन असावा, असे वाटल्याने फोन उचलला नाही. अजित पवार यांच्याकडून आपल्याला विचारणा झाल्यास आपण स्पष्टीकरण देऊ. तसेच मुंबईत रविवारी महापौर परिषदेबाबत बैठक असून, त्यास आपण उपस्थित राहणार आहोत.शकुंतला धराडे, महापौर, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका
महापौर धराडे यांचा विधानावरून यू टर्न
By admin | Published: August 07, 2016 4:14 AM