शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

उद्योगनगरी वायफाय ते शांघाय

By admin | Published: February 18, 2017 3:28 AM

पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला

पिंपरी : पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक अंतिम टप्प्यात आली असताना भारतीय जनता पक्षाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. पिंपरी-चिंचवड शहरात उत्तम आरोग्य सुविधेबरोबरच प्रत्येक नागरिकाचा तीन लाखांपर्यंतचा विमा, मोफत वाय-फाय सुविधा, इस्राइलच्या धर्तीवर शाळा, हिंजवडी ते चाकण मेट्रो, शहर टँकरमुक्त या प्रकारची आश्वासने दिली आहेत. शहर वायफाय करण्याबरोबरच शांघाय करण्याचेही स्वप्न जाहीरनाम्यातून दाखविले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भाजपाच्या जाहीरनाम्याचे प्रकाशन होणार होते. मात्र, वेळेचे गणित चुकल्याने प्रकाशन लांबणीवर पडले होते. जाहीरनाम्यास उशीर याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने प्रकाशित केले होते. त्यानंतर आज पालकमंत्र्यांच्या हस्ते अचानक प्रकाशन करण्यात आले. या वेळी खासदार अमर साबळे, शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, लोकलेखा समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. सचिन पटवर्धन, प्रदेशचे सरचिटणीस उमा खापरे, माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे, शहर सरचिटणीस महेश कुलकर्णी, बाबू नायर, नगरसेवक रवि लांडगे, भारती चव्हाण आदी उपस्थित होते. जाहीरनाम्यात २७ मुद्दे असून आरोग्य, शैक्षणिक, वाहतूक, सुरक्षितता या अनुषंगाने प्रमुख आश्वासनांबरोबरच अन्य बाबींचा समावेश आहे. यामध्ये अनधिकृत बांधकामे नियमितीकरण, मेट्रो विस्तार, वैद्यकीय महाविद्यालय, प्राधिकरणाची घरे फ्री होल्ड करणे, नद्यांचे सुशोभीकरण करणे, रस्त्याकडेला सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणे, क्रीडांगणे आणि उद्याने विकसित करणे, सुसज्ज भाजीमंडई, कचरा व्यवस्थापनात बदल, सांडपाण्याचा पुनर्वापर आणि त्यातून वीजनिर्मिती, प्रत्येक प्रभागात सांस्कृतिक कलामंचाची उभारणी, सर्व जाती-धर्मांसाठी स्मशानभूमी उभारणे या कामांचा समावेश आहे.महेश लांडगे यांची अनुपस्थितीभाजपाचा शहर जाहीरनामा प्रकाशित होण्यापूर्वी भोसरीतील जाहीरनामा प्रकाशित झाला. शिवाय शहराच्या जाहीरनामा प्रकाशनास भोसरीचे आमदार महेश लांडगे अनुपस्थित होते. दोन जाहीरनामे प्रकाशित केले आहेत.(प्रतिनिधी) शहरात मोफत वाय-फाय सुविधा, तीन लाखांपर्यंतचा आरोग्य विमा मोफत, हिंजवडी ते चाकण मेट्रो, पुरेसा पाणीपुरवठा आणि शहर टँकरमुक्त, कार्पेट एरियानुसार मिळकतकराची आकारणी, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय. झोपडपट्टी पुनर्वसन, ज्येष्ठांसाठी आनंदी ज्येष्ठत्व योजना राबविणे, सारथीचे पुनरुज्जीवन करणे, सांडपाण्यावर वीजनिर्मिती, तसेच स्वारगेट ते निगडी, स्वारगेट ते कात्रज मेट्रो सुरू करण्यात येणार आहे.भाजपात गटबाजी नाही. पुण्यात आम्ही सर्व प्रभागांचे जाहीरनामे प्रकाशित केले. पिंपरीतही ते होणार आहेत. तसेच पिंपरी, चिंचवड आणि भोसरी विधानसभा मतदारसंघनिहाय आणि खासदारांनाही जाहीरनामा तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. - गिरीश बापट, पालकमंत्री केंद्र व राज्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून शहर वायफाय करण्याबरोबरच वाहतूक व्यवस्था सक्षम करणे, स्वतंत्र पोलीस आयुक्तालय, प्राधिकरणातील घरे फ्री होल्ड करणे व अनधिकृत बांधकामे नियमित करण्याचा प्रयत्न करणार आहे. - लक्ष्मण जगताप, शहराध्यक्ष