शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: विनोद तावडे ठाकुरांच्याच कारमधून एकत्र का गेले? हितेंद्र ठाकुरांनी सगळे सांगितले...
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :"मला गोळ्या झाडा, मी मरणार नाही, तुम्हाला सोडणारही नाही"; हल्ल्यानंतर अनिल देशमुखांची पहिली प्रतिक्रिया
3
भारताचा पाकिस्तानला चॅम्पियन्स ट्रॉफीआधी मोठा धक्का; अंध T20 वर्ल्ड कपकडेही फिरवली पाठ
4
Vinod Tawde: ज्या पैशांवरून राडा केला, ते माझे नाहीतच; ज्या खोलीत पैसे सापडले तिथे मी गेलोच नव्हतो : विनोद तावडे
5
"राहुलजी, याला पोरकटपणा म्हणायचं नाही तर काय..."; विनोद तावडे यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर
6
“विनोद तावडेंवर कारवाई करत निष्पक्ष असल्याचे निवडणूक आयोग दाखवणार का?”; काँग्रेसचा सवाल
7
Indian Sports Honours 2024 : मनू, नीरज, स्मृतीसह यशस्वीचा सन्मान; पुरस्कार विजेत्यांची संपूर्ण यादी
8
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
9
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्या प्रकरणात मोठा खुलासा; आरोपीने सांगितलं नाव, कोण होता मास्टरमाइंड?
10
आदित्य ठाकरेंविरोधात भाजपची निवडणूक आयोगाकडे तक्रार; आचारसंहितेचे उल्लंघन केल्याचा आरोप
11
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
12
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
13
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
14
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
15
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
16
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
17
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
18
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
19
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
20
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा

उद्योगनगरीची नेत्रदानात पिछाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2018 1:46 AM

दृष्टिदान दिवस सर्वत्र साजरा होत आहे. अंध व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधाराला प्रकाशमय करण्यासाठी मृत व्यक्तीचे नेत्रदान होणे ही खरी गरज आहे. शहरातील नेत्रदानाची आकडेवारी पाहता याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे.

चिंचवड : दृष्टिदान दिवस सर्वत्र साजरा होत आहे. अंध व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेल्या काळ्याकुट्ट अंधाराला प्रकाशमय करण्यासाठी मृत व्यक्तीचे नेत्रदान होणे ही खरी गरज आहे. शहरातील नेत्रदानाची आकडेवारी पाहता याबाबत जनजागृती होणे महत्त्वाचे आहे. महापालिका प्रशासन आणि शासकीय, अशासकीय संस्थांनी पुढाकार घेऊन कार्य करणे ही खरी गरज आहे.शहरातील सामाजिक संघटना व काही सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी विचारात घेऊन महापालिकेने नोव्हेंबर २०१० मध्ये शहरात आदित्य बिर्ला रुग्णालयात पिंपरी-चिंचवड आदित्य ज्योत नेत्रपेढी सुरू आहे. या नेत्रपेढीत मे २०१८ पर्यंत ५७९ जणांचे मरणोत्तर नेत्रदान झाले आहे. शहरातील या नेत्रपेढीत नेत्ररोपण मोफत केले जाते. आज तागायत १७१ जणांचे नेत्ररोपण करण्यात आले आहे.याबाबतीत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत नसल्याने अडचणी येत आहेत. ज्या व्यक्तींना प्रत्यारोपण सर्जरी करावयाची आहे अशा रुग्णांची नोंदणी होणे महत्त्वाचे आहे.शहरात ही चळवळ अधिक जोमात कार्यरत होण्यासाठी पालिका प्रशासन, सामाजिक संस्था, विविध रुग्णालये, डॉक्टर यांनी पुढाकार घेऊन कार्य करणे महत्त्वाचे आहे. नेत्रपेढीत नेत्र प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी कोणतेही शुल्क आकारले जात नाही. मात्र, याबाबत अनेकांना माहिती नसल्याने याचा लाभ गरजूंना मिळत नाही.नेत्रदान ही प्रक्रिया जनसामान्यांमध्ये रुजविण्यासाठी जास्तीत जास्त प्रमाणात याचा प्रचार व प्रसार होणे ही काळाची गरज आहे. मृत्यूनंतर त्वरित नेत्रदान केल्यासयाचा लाभ दृष्टिहीन व्यक्तींना होऊ शकतो.शहरातील वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थांनी पुढे येणे महत्त्वाचे आहे. शहरात नेत्रदान अभियानात काम करणाºया संस्था व कार्यकर्ते घेत असलेल्या मेहनतीमुळे मृत्यूपश्चात नेत्रदान होत आहे. मात्र शहरातील मृत्यूचे प्रमाण पाहता हे नेत्रदान खूपच कमी आहे. नेत्रदान जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र महापालिका प्रशासनाचे याकडे पुरेसे लक्ष नसल्याने अडचणी येत असल्याचे मत या क्षेत्रात कार्य करणाºया मंडळींकडून व्यक्त होत आहे.संघटनात्मक कार्याची गरजशहरात प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंड व जागृती सोशल फाउंडेशन या संस्थांच्या माध्यमातून नेत्रदान चळवळ व्यापक झाली आहे. आजतागायत या संस्थेच्या सभासदांनी शंभराहून अधिक नेत्रदान करून घेतले आहे. शहरात विविध समाजाचे कार्यकर्ते यासाठी प्रयत्नशील आहेत. इतर शहरांच्या तुलनेत पिंपरी-चिंचवड शहरात होणारे नेत्रसंकलन अत्यल्प आहे. यासाठी वैद्यकीय क्षेत्रात काम करणाºया व्यक्ती, राजकीय व सामाजिक संघटनांनी एकत्रितपणे संघटित होऊन जनजागृती करणे महत्त्वाचे आहे.राख्यांच्या माध्यमातून जनजागृतीचिंचवडमधील एका राखी व्यावसायिकाकडून लाखो राख्यांवर ‘नेत्रदान श्रेष्ठदान’ असा संदेश दिला जातो. अनेक दृष्टिहीन बांधव या राख्या बनविण्याचे काम करत आहेत. समाजात नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर व्हावेत व मरणोत्तर नेत्रदान करावे यासाठी व्यावसायिक क्षेत्रातूनही जनजागृती केली जात आहे. या माध्यमातून नेत्रदानाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती होत आहे. दृष्टीहीन बांधव या राख्या तयार करीत असल्याने विशेष महत्व आहे.आदित्य ज्योत नेत्रपेढीतील नेत्रदानाची आकडेवारी२०११ - ५०२०१२ - ८८२०१३ - ८३२०१४ - ८३२०१५ - ८४२०१६ - ८४२०१७ - ९४२०१८ - ०८अंध बांधवांच्या व्यथा, वेदना आणि गरज या मूलभूत गोष्टी समजून घेणे महत्त्वाचे आहे. विविध माध्यमांतून येणारे अंधत्व ही मुख्य समस्या आहे. अंध व्यक्तींच्या डोळ्यांत दाटलेला अंधकार दूर करण्यासाठी मृत व्यक्तीचे नेत्रदान करून घेणे ही खरी गरज आहे. नेत्रदानाबाबत असणारे गैरसमज दूर होणे महत्त्वाचे आहे. बुबुळाच्या त्रासाने ग्रस्त असलेल्या अंध बांधवांना नेत्रदानातूनच दृष्टी मिळू शकते. बुबुळाचा कृत्रिम पर्याय उपलब्ध नसल्याने नेत्रदान हाच एकमेव पर्याय आहे. आमच्या संस्थेच्या माध्यमातून आम्ही जनजागृती करत आहोत. या मोहिमेत इतर सामाजिक संस्था, कार्यकर्ते यांचा सहभाग मिळत आहे. मात्र नेत्रदानाचे महत्त्व घराघरांत पोहचणे यासाठी व्यापक कार्य करणे महत्त्वाचे आहे.- सतीश नवले, सचिव,प्रेरणा असोसिएशन फॉर दि ब्लाईंडमहापालिकेने नेत्रदान जनजागृतीबाबत योग्य नियोजन केल्यास शहराची सामाजिक क्षेत्रातील उंची वाढू शकते. यशवंतराव चव्हाण रुग्णालयात मृत्यूचे दाखले देते वेळी नातेवाइकांना नेत्रदानाबाबत माहिती दिल्यास याचा फायदा होऊ शकतो. जनजागृतीसाठी पत्रके वाटप, फ्लेक्स लावून व मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून जनजागृती करणे महत्त्वाचे आहे. शहरातील सार्वजनिक ठिकाणे, रुग्णालये, स्मशानभूमी या ठिकाणी माहिती फलक लावल्यास नेत्रदानाविषयीचे गैरसमज दूर होतील.- कविता स्वामी,सामाजिक कार्यकर्त्या, भोसरीशहरातील विविध उड्डाणपूल, मोठ-मोठे प्रकल्प, सेवासुविधा ही जशी शहराची गरज आहे तसेच या शहरात होणारे सामाजिक कार्य ही सुद्धा शहराची ओळख असते. शहरात नेत्रदान जनजागृतीसाठी एक समिती स्थापन करावी व या माध्यमातून नेत्रदानाबाबत जनजागृतीसाठी नियोजन करावे. या क्षेत्रात कार्य करणाºया व्यक्ती, वैद्यकीय अधिकारी, यांचा समावेश या समितीत करावा यामुळे शहरात चांगले कार्य होऊ शकते.- मोनिका गांधी,सामाजिक कार्यकर्त्या, चिंचवडसामाजिक संघटना व कार्यकर्ते शहरात नेत्रदानानाबाबत जनजागृती करत आहेत. मात्र याला मर्यादा आहेत. फक्त नेत्रदानाचे अर्ज भरून ही गरज पूर्ण होणार नाही. यासाठी प्रत्यक्ष कृतीची आवश्यकता आहे. अनेक राजकीय मंडळी, सामाजिक संस्था विविध कार्यक्रमांचे आयोजन करून नेत्रदानाचे अर्ज भरून घेत असतात. मात्र, नेत्रदानाबाबत असलेले गैरसमज दूर करण्यासाठी मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करणे महत्त्वाचे आहे. मृत्यूनंतर होणाºया नेत्रदान प्रक्रियेतून अंधकार दूर होणार आहे.- शैलेंद्र पांडये, सामाजिक कार्यकर्ते, चिंचवडनेत्रदानाबाबत ही माहिती गरजेची४मृत्यूनंतर त्वरित दोन्ही डोळ्यांच्या पापण्या बंद करून त्यावर ओल्या कापसाची पट्टी ठेवणे आवश्यक.४जवळच्या नातेवाइकांची संमती घेऊन ताबडतोब नेत्रपेढीला कळविणे महत्त्वाचे आहे. ही प्रक्रिया पूर्णपणे मोफत असते.४डोळे टिकवून ठेवण्यासाठी सहा तासांच्या आत नेत्रपेढीकडे पोहोचणे जरुरी असते.४चष्मा असणाºया अथवा मोतिबिंदू असणाºया व्यक्तींचेही नेत्रदान करता येते.४नेत्रदानासाठी कोणतीही वयोमर्यादा नसते. निरोगी असणाºया कोणत्याही व्यक्तीचे नेत्रदान करता येते.४पोलिओ, धनुर्वात, कर्करोग, एड्स, रेबीज व ज्यांच्या डोळ्यांत पांढरे डाग असतील अशा व्यक्ती नेत्रदान करू शकत नाहीत.४संमती पत्र (फॉर्म) न भरलेल्या व्यक्तींचेही ऐनवेळीसुद्धा नेत्रदान करता येते. यासाठी नातेवाइकांची परवानगी असणे महत्त्वाचे आहे.४मृत व्यक्ती असेल तेथेही नेत्रदान करता येते. यामुळे चेहºयावर विद्रूपता येत नाही. अथवा अंत्यविधीसाठी विलंबही होत नाही.४दान केलेल्या संपूर्ण डोळ्यांचे कलम होत नाही. तर बुबुळाच्या पारदर्शक पापुद्र्याच्या भागाचेच रोपण केले जाते.४युरोपियन देशामध्ये अपघाती मृत्यूनंतर नेत्रदान करणे बंधनकारक असून, वाहन परवाना देतेवेळी याबाबत पत्र अथवा शिक्का दिला जातो.४श्रीलंका हा देश इतर एकशे पंचेचाळीस देशांना बुबुळ पुरवठा करतो. त्यांच्याकडे याबाबत सर्वाधिक महत्त्व दिले जाते.४शहरात नोव्हेंबर २०१० मध्ये नेत्रपेढी सुरू करण्यात आली. पिंपरी-चिंचवड महापालिका व आदित्य बिर्ला हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड आदित्य ज्योत नेत्रपेढी सुरू झाल़ या नेत्रपेढीत आजपर्यंत ५७९ जणांचे नेत्रदान झाले आहे.

टॅग्स :Organ donationअवयव दानpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड