शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंना दिल्लीत आणा, ऐकलेच नाहीत तर भाजपाने अजित पवारांसोबत सत्ता स्थापन करावी; केंद्रीय मंत्र्याचे वक्तव्य
2
EVM अन् डायरीतील मतांमध्ये फरक कसा आला?; सोलापुरातील प्रकाराबाबत नवी माहिती उघड
3
Video - खांद्यावर शाल, हातात बॉम्ब आणि नाईट क्लब टार्गेट; चंदीगड हल्ल्याचं CCTV फुटेज
4
एकनाथ शिंदेंनी मोदी-शाहांकडे कळवला निर्णय; मुख्यमंत्रिपदावरून काय बोलले?
5
हरयाणा, महाराष्ट्रानंतर आता भाजपाचा दिल्लीवर डोळा, केजरीवालांना नमवण्यासाठी आखली अशी रणनीती
6
video: गावात शिरली 20 फुटी मगर; तरुणाने पकडून खांद्यावर घेतले अन् सुखरुप नदीत सोडले...
7
रेखा झुनझुनवालांनी २ शेअर्समधून १० मिनिटांत कमावले ₹१०५ कोटी, तुमच्याकडे आहेत का 'हे' स्टॉक्स?
8
मोठी बातमी: दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत एकनाथ शिंदेंनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा
9
सोन्याच्या ४० खाणी, इतकं सोनं की विचारूच नका; 'यांच्या' हाती लागला कुबेराचा खजिना
10
Pune Crime: महिलेची हत्या, पोत्यात बांधून झुडपात फेकला मृतदेह; घटना कशी आली उघडकीस?
11
नामांकित कॉलेजमधील शिक्षकाकडून विद्यार्थिनीसोबत व्हॉट्सॲपवर अश्लील चॅटिंग; अकोले इथं तणाव
12
प्रसाद ओकने असं काय विचारलं की मंंजिरीने थेट चिमटाच गरम केला? पती-पत्नीचा धमाल व्हिडीओ व्हायरल
13
Fact Check : नागपुरात EVM सह भाजपाचे कार्यकर्ते पकडल्याचा दावा खोटा; नेमकं प्रकरण काय?
14
Baba Siddiqui :"लॉरेन्स बिश्नोई गँगने मूर्ख बनवलं, दाऊदचा फोटो दाखवला अन्..."; आरोपीचा खळबळजनक खुलासा
15
"रेशीमगाठ कधीच झाकोळली गेली नाही...", प्राजक्ताची मालिकेसाठी खास पोस्ट; प्रेक्षकांचे मानले आभार
16
सर्वात मोठी डिजिटल अरेस्ट! १ महिना WhatsApp कॉलवर Live; लुटले तब्बल ३.८ कोटी
17
मुख्यमंत्रिपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब? दिल्लीत झाला निर्णय, सूत्रांची माहिती
18
हलगर्जीपणाचा कळस! प्रसूतीनंतर डॉक्टरांकडून पोटात राहिला 'टॉवेल'; महिलेला प्रचंड वेदना अन्....
19
Perfect Tea Recipe: टपरीवरचा फक्कड चहा बनवा घरच्या घरी; फक्त 'आलं' टाकताना करा 'हा' छोटासा बदल!
20
Vodafone Idea च्या शेअर्समध्ये १७% ची तेजी, सरकारच्या एका निर्णयामुळे गुंतवणूकदारांच्या उड्या

अनधिकृत बांधकामांना अभय

By admin | Published: September 13, 2016 1:17 AM

अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची, बीट निरीक्षक आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे

रहाटणी : अनधिकृत बांधकामांवर नियंत्रण आणण्याची जबाबदारी महापालिकेच्या अतिक्रमण विभागाची, बीट निरीक्षक आणि संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्यांची आहे. ज्यांनी अनधिकृत बांधकामांना अटकाव घातला पाहिजे, त्यांच्याकडूनच अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार घडू लागला असून, अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई होणार का, असा प्रश्न नागरिक उपस्थित झाला आहे.न्यायालयाचे आदेश आणि महापालिकेने यापूर्वी केलेली अनधिकृत बांधकामाविरुद्धची कारवाई यामुळे भयभीत झालेले नागरिक अनधिकृत बांधकाम करण्यास कचरत आहेत. परंतु महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडूनच अनधिकृत बांधकामांना प्रोत्साहन दिले जात आहे. पिंपरीत असेच एक अनधिकृत बांधकाम सुरू आहे. उमेश बिराजदार यांनी माहितीच्या अधिकारात मागविलेल्या माहितीत उघड झाले आहे.पालिका अधिकाऱ्यांच्या संमतीने पिंपरी येथील साधू वासवानी उद्यानासमोर एक अनधिकृत बांधकाम सुरू आहे. बांधकामधारकास पालिकेने २५ फेब्रुवारी २००५ ला बांधकाम सुरूचा दाखला दिला. मात्र, संबंधित जागामालकाने दिलेल्या मुदतीत काम सुरू केले नाही. अनेक वर्षे बांधकाम न केलेल्या ठिकाणी सध्या बांधकाम सुरू झाले. पहिला स्लॅबही पडला आहे. बांधकामाच्या ठिकाणी बांधकाम परवाना असल्याचा फलक लावला आहे. बांधकाम परवान्याची तारीख २५ फेब्रुवारी २०१५ अशी दाखविली. जेव्हा माहितीच्या अधिकारात माहिती मागितली तेव्हा खरा प्रकार समोर आला. २६ आॅगस्ट २०१६ ला मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, पालिका आयुक्त, शहर अभियंता यांच्याकडे लेखी तक्रार केली. त्यानंतर पालिका प्रशासन जागे झाले. (वार्ताहर)