पिंपरी : डांगे चौक ते हिंजवडी मार्गावरील वाकड येथील भूमकर चौकात वाहतूककोंडी होते. व्यावसायिकांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. त्यामुळे वाहतुकीस अडथळा होतो. पदपथावर बेशिस्तपणे पार्किंग केली जाते. परिणामी अपघाताचा धोका असून, पादचाऱ्यांची सुरक्षा वाºयावर आहे. महापालिका प्रशासन आणि वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष आहे. वाहतूककोंडी सोडविण्यासाठी उपाययोजना करून संबंधितांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून करण्यात येत आहे.
शहरातील मुख्य चौकांपैकी एक भूमकर चौक आहे. हिंजवडी आयटी पार्ककडे जाणारी वाहने या चौकातून जातात. या चौक परिसरात व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. अतिक्रमणांमुळे पदपथ गायब झाले आहेत. व्यावसायिकांनी हे पदपथबळकावले आहेत. त्यामुळे पादचाºयांना पदपथांचा वापर करता येत नाही. काही ठिकाणी व्यावसायिकांनी पदपथाची तोडफोड केली आहे.भूमकर चौकातून हिंजवडीला जाणाºया रस्त्यावरील पदपथावर पाणीपुरी विक्रेते, भाजी विक्रे ते, लिंबूपाणी विक्रेते, ताकविक्रेते यांनी पदपथावर ठाण मांडले आहे. काही जणांनी पदपथावर कार्यालये थाटली आहेत. पदपथावरील विक्रेत्यांकडून भाजीपाला आणि अन्य खरेदीसाठी येणारे ग्राहक रस्त्यातच वाहन थांबवितात. त्यामुळे येथील कोंडीत भर पडते. काही रिक्षाचालकही भर रस्त्यातच रिक्षा थांबवितात.अतिक्रमणाचा विळखाभूमकर चौक परिसरातील पदपथावरील अतिक्रमण दिवसेंदिवस वाढतच आहे. येथील पदपथाचा वापर पादचाºयांना करता येत नाही. जागोजागी हातगाडीवाले, छोटे व्यावसायिक पदपथांवर ठाण मांडून असतात. अतिक्रमणविरोधी पथकाने कारवाई केल्यानंतरही ही समस्या सुटत नाही. कारवाईनंतर लागलीच ‘जैसे थे’ परिस्थिती होते.- शिवप्रसाद पवार, ज्येष्ठ नागरिकभूमकर चौक परिसरातील व्यावसायिकांनी पदपथाची मोडतोड केलेली आहे. अनेक व्यावसायिकांनी पदपथावर दुकान थाटले आहे. भाजी विक्रेत्यांसह अन्य व्यावसायिकांनी पदपथ बळकावले आहेत. हॉटेलवाल्यांनी पदपथावरच खुर्ची, टेबल ठेवले आहेत. परिणामी पादचाºयांना या पदपथांचा वापर करता येत नाही. महापालिका प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष आहे.- यश पिंगळे, तरुणभूमकर चौकातून हिंजवडीला जाणाºया रस्त्याच्या पदपथावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलेले आहे. त्या ठिकाणी भाजी विक्रेते, हातगाडीधारक असतात. दुचाकी, चारचाकी गाड्या पदपथावर पार्किंग केल्या जातात. यामुळे पदपथ नेमका कोणासाठी, असा प्रश्न उपस्थित होत आहे. दिवसभरातून त्या ठिकाणी कधी जरी गेले तरी गाड्या पार्किंग केलेल्या असतात. पदपथाचा वापर करता येत नाही. अपघात होण्याची भीती वाढते. - निकिता माने, तरुणीभूमकर चौकात वाहतूककोंडी मोठ्या प्रमाणात होते. त्याची कारणे अनेक आहे. बेशिस्तपणे गाडी चालवणे, बेशिस्तपणे गाडी लावणे, रस्त्यावरच गाडी लावणे, त्यानंतर सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पदपथच राहिले नाहीत. कधी-कधी असा प्रश्न पडतो, की रस्त्याच्या बाजूचे पदपथ गेले तरी कुठे नेमके? पदपथावर हातगाडीधारक, छोटे व्यावसायिकांनी, भाजी विक्रेते यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केले आहे. - पवन शिर्के, नागरिक