निगडी : पिंपरी-चिंचवड शहरात वाढलेली वाहनसंख्या आणि वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष यामुळे निगडी येथील दुर्गानगर चौकात दररोज वाहतूककोंडी होत आहे. सतत होत असलेल्या वाहतूककोंडीला नागरिकांना तोंड द्यावे लागते. रस्त्याच्या दुतर्फा लावण्यात येत असलेल्या अस्ताव्यस्त वाहनांमुळे अर्थात बेशिस्त पार्किंगमुळे वाहतूककोंडीत आणखीनच भर पडते.तळवडे येथील आयटी पार्क, भोसरी, चाकण एमआयडीसीकडून ये-जा करणारी वाहने, निगडी यमुनानगरकडून चालणारी वाहतूक या सर्व वाहतुकीचा दुर्गानगर चौक केंद्रबिंदू असल्याने या चौकातून ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने वाहतुकीचा मोठा प्रश्न उद्भवत आहे. रस्त्यावरील वाढत्या रहदारीमुळे पादचारी व वाहनचालकांना जीव मुठीत घेऊन या चौकातून प्रवास करावा लागत आहे.दुर्गानगर चौकातून चाकण, तळवडे, भोसरी येथील औद्योगिक क्षेत्रामध्ये जाणाºया कामगारांचीसंख्या मोठ्या प्रमाणात आसते. तसेच या औद्योगिक वसाहतीमध्ये मालवाहतूक करणारे कंटेनर, ट्रक कंपन्याच्या बसगाड्या, मोटारी आणि दुचाकी वाहनांची या रस्त्यावर दिवसभर वर्दळ असते. तसेच याच चौकातून मोठी लोकवस्ती असलेल्या यमुनानगर, अजंठानगर या भागातून ये-जा करणाºया विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. या चौकात सकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत ये-जा सुरू असते. मात्र विद्यार्थी, पालक, ज्येष्ठ नागरिकांना आपल्या मुलांसह जीव मुठीत धरून या चौकातून प्रवास करावा लागत आहे.निगडीतील मधुकर पवळे उड्डाणपुलाकडून चाकण, भोसरीकडे जाणारी अवजड वाहने या रस्त्याने भरधाव वेगात येतात़ परंतु या चौकात कोणतेही गतिरोधक अस्तित्त्वात नसल्याने वाहनचालकांची अनेकदा धांदल उडते. त्यात रिक्षाचालक रस्ता रिकामा होण्याची वाट न पाहता धोकादायकपणे रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न केला जातो. अनेकदा वादावादीचे प्रसंग घडले आहेत.चौका शेजारीच बजाज लिमिटेड कंपनी आसल्याने या चौकातून ये-जा करणाºया कामगार वर्गाची वर्दळ मोठ्या प्रमाणात असते. या कंपनी समोरील रस्त्यावर रिक्षाचालक ठाण मांडूनच उभे असतात. रिक्षाचालक वाहतुकीच्या कोणत्याही नियमांचे पालन न करता रिक्षा कुठेही थांबवतात. यामुळे कोंडीत अधिकची भर पडते. मात्र अशा रिक्षाचालकाला अथवा चार चाकी वाहनांवर वाहतूक पोलीस कोणतीही कारवाई करीत नसल्याचे अढळून येत आहेत.महापालिका व वाहतूक विभागाने वेळीच लक्ष देऊन येथे उपाययोजना करणे आवश्यक आहे. नियमित होणारी वाहतूककोंडी व अपघात याबाबत विशिष्ट योजना राबवून वाहतूक समस्या सोडवावी, अशी मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालक करीत आहेत.चालकांमध्ये होतात वादवाहतूककोंडी अथवा वाहनांचा खोळंबा झाल्यानंतर चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न काही दुचाकीचालक आणि बेशिस्त वाहनचालक करतात. यातून अपघाताचे प्रकार होतात. काही बेशिस्त वाहनचालक अन्य वाहनचालकांना अरेरावी करतात. त्यामुळे येथे सातत्याने वादाचे प्रकार होतात. याकडेही पोलिसांचे दुर्लक्ष असते.वाहतूक पोलिसांचे दुर्लक्षवाहतुकीवर नियंत्रण न ठेवता वाहनचालकांकडून दंडात्मक कारवाईवर पोलिसांकडून भर देण्यात येतो. त्यामुळे दुर्गानगर चौकातील वाहतूक रामभरोसे असल्याचे चित्र आहे. यामुळे अनेक बेशिस्त वाहनचालक भरधाव वेगात सिग्नल तोडतात. यामुळे वाहनचालकांची चांगलीच धांदल उडते. यामुळे या चौकात सतत छोटे मोठे अपघात होत असतात. यामुळे या चौकात वाहतूककोंडी ही नित्याचीच बाब बनली आहे. यामुळे येथून प्रवास करणारे नागरिक व चाकरमान्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.अवजड वाहनांमुळे खोळंबादुर्गानगर चौकातून अवजड वाहनांची वर्दळ असते. एमआयडीसी भागातील अनेक कंपन्यांतील साहित्य वाहतूक करण्यासाठी ट्रक, कंटेनर आदी अवजड वाहने या चौकातून जातात. या वाहनांची लांबी जास्त असल्याने येथे वळण घेताना या वाहनांमुळे सातत्याने वाहतुकीचा खोळंबा होतो. परिणामी येथे वाहतूककोंडी होते.पादचारी मार्गावर पार्किंगरस्त्याच्या दुतर्फा पादचारी मार्ग उभारण्यात आले आहेत. परंतु या पादचारी मार्गावर स्थानिक नागरिक किंवा अन्य वाहनचालक वाहने पार्किंग करतात. परिणामी पादचारी मार्ग अडविले जातात. काही व्यावसायिकांकडून या पादचारी मार्गावर हातगाडी आदी लावण्यात येते. त्यामुळे पादचाºयांना पादचारी मार्गाचा वापर करणे शक्य होत नाही. परिणामी पादचाºयांना भर रस्त्यातून ये-जा करावी लागते. यामुळे येथे पादचाºयांना वाहनांची धडक बसून अपघात होण्याचे प्रकार सातत्याने घडत आहेत. यातून पादचाºयांच्या सुरक्षेचा प्रश्न उपस्थित होत आहे.
बेशिस्त वाहनचालकांकडून नियम पायदळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2018 6:52 AM