शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
3
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
4
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
5
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
6
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
7
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
8
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
9
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
10
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
11
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
12
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
13
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
14
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
15
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
16
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
17
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
18
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!
19
विधानसभा संपल्या, आता विधान परिषदेवर लक्ष; महायुतीच्या कोणत्या 6 नेत्यांना लागणार लॉटरी?
20
बनावट ASP बनून फिरली, पोलिसांनी केलं सॅल्यूट; एक छोटीशी चूक होताच झाली पोलखोल

निगडीपर्यंत मेट्रोसाठी केंद्र शासन सकारात्मक, केंद्रीय मंत्री हरदीपसिंग पुरी यांचे आश्वासन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2017 6:35 AM

पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी साकडे घातले. पुणे मेट्रोला स्वारगेट ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मंजुरी देण्याची मागणी केली.

पिंपरी : पुणे मेट्रो निगडीपर्यंत नेण्यासाठी केंद्रीय शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी यांची दिल्ली येथे भेट घेऊन खासदार श्रीरंग बारणे यांनी साकडे घातले. पुणे मेट्रोला स्वारगेट ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मंजुरी देण्याची मागणी केली. या वेळी वाढीव मेट्रो मार्गाच्या खर्चाची जबाबदारी राज्य शासन व महापालिकेने घेतल्यास केंद्र शासन मंजुरी देण्यास सकारात्मक असल्याचे आश्वासन हरदीपसिंग पुरी यांनी दिले.पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील मेट्रो रेल्वे कार्यान्वित करण्याचा निर्णय राज्य शासनाने पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पातील मार्ग क्रमांक १ स्वारगेट ते पिंपरीला मान्यता दिली़ पहिल्या टप्प्यामध्येच निगडी भक्ती-शक्ती चौकपर्यंत मेट्रो मार्गिका सुरू व्हावी, ही पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची मागणी आहे. या मागणीचा विचार करून २९ आॅक्टोबर २०१३ च्या महाराष्ट्र शासन निर्णयानुसार पुणे मेट्रो रेल्वे प्रकल्पाने सादर केलेल्या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे दि. २ सप्टेंबर २०१४ ला मंजुरीसाठी पाठवला होता. प्रस्तावास केंद्र सरकारची मंजुरी व प्रकल्पासाठी आर्थिक निधीची तरतूद येत्या अर्थसंकल्पात करावी, अशी मागणी श्रीरंग बारणे यांनी केली.स्वारगेट ते निगडी भक्ती-शक्ती चौकापर्यंत मेट्रो रेल्वे सेवा करण्यासाठी लोकसभेमध्ये प्रश्न उपस्थित करून संबंधित मंत्रालयाशी पत्र व्यवहार केला आहे़ त्याचबरोबर मुख्यमंत्री व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्तांनीही पत्र पाठवून प्रकल्पाचा खर्च उचलण्याची मागणी केली आहे. पिंपरी ते भक्ती-शक्ती या वाढीव मेट्रो रेल्वे मार्गाला होणारा खर्च कोणी करायचा त्यामध्ये महाराष्ट्र शासन, पिंपरी-चिंचवड महापालिका व केंद्रसरकार आपला किती आर्थिक सहभाग देणार यावर चर्चा सुरू आहे. महानगरपालिका या प्रकल्पासाठी खर्च करण्यास तयार असल्यास केंद्र सरकारच्या वतीने तत्काळ मंजुरी मिळणार आहे, असे बारणे म्हणाले.

टॅग्स :PuneपुणेMetroमेट्रो