कामशेत : मध्य रेल्वेच्या अप ट्रकवर बुधवार ( दि १९ ) रोजी पहाटेच्या दीड च्या सुमारास कोणार्क एक्सप्रेस मधून पडून एका अज्ञात व्यक्तीचा गंभीर जखमी होऊन मृत्यु झाला.लोहमार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कामशेत शहरातील हद्दीमध्ये रेल्वेच्या अप ट्रॅकवर किलोमीटर न १४४/५२ जवळ भुवनेश्वर वरून मुंबईला जाणाऱ्या कोणार्क एक्सप्रेस मधून पडून एका अज्ञात व्यक्तीचा मृत्यु झाला आहे. ही व्यक्ती रंगाने काळी, सरळ नाकाची मजबूत बांध्याची आहे. अंगात निळ्या रंगाची पॅन्ट, जांभळ्या रंगाचा शर्ट घातला आहे. या व्यक्तीचे वय अंदाजे ३० -३५ आहे . याप्रकरणी पुढील तपास हवालदार एल. जी. पठाण करत आहेत.
कोणार्क एक्सप्रेस मधून पडून अज्ञात व्यक्तीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 17:48 IST