तळेगाव स्टेशन : मराठा क्रांती मोर्चाचे प्रतीक म्हणून तळेगाव-चाकण रस्त्यावरील सिंडिकेट बँकेसमोरील मराठा क्रांती चौकाचे नामकरण आणि स्मारकाचे अनावरण करण्यात आले.नऊ आॅगस्टला राज्यभर झालेल्या मराठा क्रांती मोर्चा आंदोलनाच्या अनुषंगाने जाहीर करण्यात आलेल्या ‘मराठा क्रांती चौक’ स्मारक अनावरण आणि नामकरण शिवस्वराज्यातील सरदार दाभाडे घराण्याच्या वारसदार दिवीजाराजे धवलसिंहराजे दाभाडे आणि देवीश्रीराजे धवलसिंहराजे दाभाडे भगिनींच्या हस्ते झाले.मावळचे आमदार बाळा भेगडे, उद्योजक किशोर आवारे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, उपनगराध्यक्ष संग्राम काकडे, अंजलीराजे दाभाडे, सत्येंद्रराजे दाभाडे, याज्ञसेनीराजे दाभाडे, सत्यशीलराजे दाभाडे, दिव्यलेखाराजे दाभाडे, अॅड. रवींद्र दाभाडे, सुलोचना आवारे, चंद्रभान खळदे, गणेश भेगडे, गणेश खांडगे, सुनील शेळके, संतोष दाभाडे पाटील, किरण ओसवाल, सुनील करंडे, संतोष शिंदे, अरुण भेगडे, प्रशांत ढोरे, संतोष लोणकर, महेश बेंजामीन, अमोल शेटे, सुनील पवार, सचिन टकले उपस्थित होते. दरवर्षी आॅगस्ट क्रांती दिनाला येथे मानवंदना दिली जाईल, याची ग्वाही आमदार भेगडे यांनी दिली. नवलाख उंब्रेचे सरपंच दत्तात्रेय पडवळ यांनी सूत्रसंचालन केले. सुशील सैंदाणे यांनी आभार मानले. समीर दाभाडे, शेखर दाभाडे, बळीराम वाघमारे, भीमसेन मिरजे यांच्यासह आदर्श रिक्षा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी नियोजनासाठी विशेष परिश्रम घेतले. या वेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मराठी क्रांती मोर्चा चौक फलकाचे अनावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2018 2:10 AM