- विशाल विकारीलोणावळा - गुलाब फुलांचे उत्पादन करणाऱ्या मावळ तालुक्यातून यावर्षी व्हॅलेंटाइन-डे करिता ५० लाखांच्या जवळपास फुले परदेशी बाजारपेठेत निर्यात करण्यात येतील. ८ फेब्रुवारीपर्यंत ही सर्व गुलाब फुले एक्सपोर्ट होणार आहेत.परदेशासह स्थानिक बाजारपेठ ८० लाखांच्या जवळपास गुलाब फूल विक्रीचे लक्ष ठेवण्यात आले असल्याची माहिती पवना फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर यांनी दिली. टॉप सिक्रेट नावाच्या लाल रंगाच्या गुलाबाला विदेशी बाजारात मोठी मागणी आहे.मावळ तालुक्यात सुमारे २५० हेक्टर क्षेत्रावर पॉलिहाऊसच्या माध्यमातून गुलाब पुष्पाचे उत्पादन घेतले जाते. यापैकी १५० ते १७५ हेक्टर क्षेत्रावरून परदेशी बाजारात ‘व्हॅलेंटाइन-डे’ करिता फुले निर्यात केली जातात.परदेशात निर्यात होणाºया गुलाब फुलांमध्ये जवळपास साठ टक्के फुले ही मावळातून निर्यात केली जातात. यावर्षी थंडीचा कडाका कायम राहिल्याने फूल उत्पादन तयार होण्यास काहिसा विलंब झाला.मावळातील फूलउत्पादक शेतकरी वर्षभर गुलाब फुलाचे उत्पादन घेत असतात. १४ फेब्रुवारी रोजी असलेल्या व्हॅलेंटाइन-डे ला गुलाब फुलांना सर्वाधिक मागणी असल्याने ह्या काळात जास्तीत जास्त गुलाब फुलांचे उत्पादन कसे होईल. याकरिता डिसेंबर महिन्यापासून शेतकरी नियोजन करतात़ त्याकरिता झाडांची व फुलांची वाढ, अवश्यक ती औषध फवारणी, छाटणी ह्या कामांवर लक्ष दिले जाते. साधारण २५ जानेवारी ते ८ फेब्रुवारीदरम्यान ही सर्व फुले विदेशी बाजारात एक्सपोर्ट केली जातात. त्यानंतरची फुले ही स्थानिक बाजारपेठांमध्ये पाठवली जातात.समूह गटाद्वारे पॉलिहाऊसमध्ये निर्यातक्षम गुलाबविदेशी बाजारपेठेत यावर्षी फुलांना सरासरी १२ ते १३ रुपये तर स्थानिक बाजारपेठेमध्ये ८ ते ९ रुपये भाव मिळत आहे. पवना फूल उत्पादक संघाच्या माध्यमातून चंद्रकांत कालेकर, ज्ञानेश्वर ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, विश्वनाथ जाधव व मुकुंद ठाकर या पाच शेतकºयांनी एकत्र येत पॉलिहाऊसमधील माल विदेशी बाजारपेठेत विक्री करण्याची स्वतंत्र यंत्रणा तयार केली असून, त्या माध्यमातून काम केले जाते. सामूहिक शेतीचा विस्तार करत नव्याने काही क्षेत्रावर पॉलिहाऊस तयार केले जाणार असल्याचे ठाकर यांनी सांगितले. तसेच येथील वाघू मोहोळ, सतीश मोहोळ व सचिन मोहोळ यांनी देखील पाच एकर जागेवर गुलाब फुलांचे उत्पादन घेतले असून, सर्वत्र यंत्रणेद्वारे सव्वालाख फुले विक्रीचे ध्येय ठेवल्याचे त्यांनी सांगितले.
व्हॅलेंटाइन-डे : मावळातून यंदा ५० लाख गुलाबांची निर्यात
By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2019 12:58 AM