पिंपरी : सुरक्षा भिंतीलगतच्या झाडाझुडपात बलात्काराची घटना घडल्यानंतर वल्लभनगर एसटी आगार व्यवस्थापकांनी गंभीर दखल घेऊन सुरक्षेच्या तातडीने उपाययोजना केल्या. पोलीस मदत केंद्र सुरू व्हावे, अशी मागणी आगारातर्फे केली, जागाही उपलब्ध करून दिली, पोलीस मदत केंद्र सुरू झाले, काही दिवसांतच बंदही झाले. लसनी बॉम्बच्या (डुक्कर बॉम्ब) स्फोटात याच परिसरात एका कुत्र्याचा बळी गेला होता. अशाच बॉम्बस्फोटाच्या घटनेची शनिवारी पुनरावृत्ती झाली. येथील सुरक्षा व्यवस्था रामभरोसे असल्याचे निदर्शनास आले असून सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.पिंपरी-चिंचवड वल्लभनगर एसटी आगारात आतापर्यंत बॉम्बसदृश्य वस्तूंच्या तीन घटना घडल्या आहेत. एसटीत राहिलेल्या पार्सल बॉक्समधील जिलेटिनचा स्फोट होऊन कामगार जखमी झाल्याची पहिली घटना घडली. त्यानंतर २ नोव्हेंबर २०१५ ला ऐन दिवाळीच्या सुटीत प्रवाशांची गर्दी वाढलेली असते, अशा काळात लसनी बॉम्बचा (डुक्कर बॉम्ब) एसटी आगाराच्या आवारात स्फोट झाला. त्यात एक कुत्रे दगावले. या घटनेनंतर शनिवारी १५ एप्रिलला लसनी बॉम्बचा स्फोट होऊन दोन कुत्रीठार झाली.पोलीस नसल्याने होतेय गैरसोयएसटी आगार व्यवस्थापनाने ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावले आहेत. पोलीस मदत केंद्रासाठी जागा उपलब्ध करून दिली आहे. सुरक्षारक्षक तैनात ठेवले आहेत. सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या आहेत. मागील प्रवेशद्वारातून खासगी वाहने तसेच कोणीही केव्हाही प्रवेश करत होते. ते मागील बाजूचे प्रवेशद्वार बंद केले आहे. प्रवासी, तसेच एसटी बसगाड्यांना आत येण्यासाठी एकच प्रवेशद्वार खुले ठेवले आहे. या बदलांमुळे अनेक गैरप्रकारांना आळा बसला आहे. प्रवाशांच्या बॅगा तपासण्याचे अधिकार एसटी कर्मचाऱ्यांना नाहीत. तसेच अशा पद्धतीने सामान्य प्रवाशांची वारंवार तपासणी करणेही संयुक्तिक नाही. पोलीस मदत केंद्रास जागा दिली आहे, मात्र त्या ठिकाणी पोलीस कर्मचारी उपलब्ध होत नाही. असे एसटी आगार अधिकारी कर्मचाºयांचे म्हणणे आहे. सुरक्षिततेची ठोस उपाययोजना करायची असेल तर सर्व बंदिस्त करावे लागेल, असेही अधिकाºयांचे म्हणणे आहे.वल्लभनगर एसटी आगारात लसणी बॉम्बच्या स्फोटात दोन कुत्री ठार झाली. या घटनेमुळे परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. संशयित व्यक्ती अथवा कोणाच्या संशयित हालचाली दिसून आल्यास तातडीने पोलिसांना कळवावे, असे आवाहन आगारातील कर्मचाºयांना केले आहे. लसणी बॉम्ब या परिसरात टाकण्याचे कारण काय असू शकते, याचा शाध घेतला जात आहे.- गणेश शिंदे, पोलीस उपायुक्त, परिमंडल तीन
वल्लभनगर आगार : सुरक्षाव्यवस्था रामभरोसे; पोलीस मदत केंद्र बंद, प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2018 3:23 AM