शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य
2
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
3
“नापी है मुठ्ठी भर जमीन, अभी सारा आसमान बाकी है”; शिंदेंनी शायरीतून सांगितला 'फ्युचर प्लॅन'
4
भयंकर! व्लॉगरची हत्या करून २ दिवस मृतदेहासोबत राहिला बॉयफ्रेंड; काय आहे हे संपूर्ण प्रकरण?
5
“देवेंद्र फडणवीसांना मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेंचा पाठिंबा आहे का?”; भाजपाने केले स्पष्ट
6
Maharashtra Politics : मोदी-शाह म्हणतील तसं! जो मुख्यमंत्री ठरवाल, त्याला आमचा पाठिंबा; एकनाथ शिंदेंनी जाहीरच करून टाकलं
7
"...अन्यथा तुम्हाला सरकारी नोकरी गमवावी लागेल", मुख्यमंत्र्यांनी घेतला मोठा निर्णय
8
'लव्ह अँड वॉर'च्या सेटवरुन Photos लीक, रेट्रो लूकमध्ये दिसली आलिया तर रणबीरचा डॅशिंग अवतार
9
Baba Siddique : "मारेकऱ्यांच्या खात्यावर पैसे पाठवण्यासाठी मिळाले ५० हजार"; आरोपीने दिली महत्त्वाची माहिती
10
शिंदे उद्या दिल्लीला जाणार! भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस, अजित पवारांचीही बैठक होणार
11
"सगळ्या पदांपेक्षा लाडका भाऊ ही ओळख मोठी"; एकनाथ शिंदेंचं CM पदाबाबत सूचक विधान
12
"नाराज होऊन आम्ही रडणारे नाही", एकनाथ शिंदेंकडून मुख्यमंत्रीपदावरील दावा सोडण्याचे संकेत 
13
एकनाथ शिंदेंनंतर लगेचच भाजपही पत्रकार परिषद घेणार; काय घडतेय...
14
अमित शाह यांच्या दालनात शिवसेनेच्या खासदारांना जमण्याच्या सूचना; श्रीकांत शिंदे अनुपस्थित राहणार?
15
मुख्यमंत्रिपदाची शर्यत! अजित पवार निघाले शरद पवारांनीच मळलेल्या वाटेवर; दिल्लीत गाठीभेटी
16
Defence Stock: डिफेन्स स्टॉक्स पुन्हा एकदा सुस्साट, एक्सपर्ट बुलिश; पाहा काय आहेत नवी टार्गेट प्राईज
17
सत्तेत असावे की, सत्तेबाहेर? बच्चू कडूंनी जनतेलाच विचारला सवाल
18
ICC Test Rankings: जसप्रीत बुमराह पुन्हा 'नंबर १'! यशस्वी जैस्वाल, विराट कोहलीचीही कसोटी यादीत मोठी झेप
19
शेजाऱ्याने मुलाला केलं किडनॅप, नंतर शोधण्याचं नाटक; खंडणी न मिळताच भयंकर कृत्य अन्...
20
विरोधकांना EVMवर संशय, कोर्टात जायची तयारी; भाजपा नेतृत्वाचे भाष्य, म्हणाले, “लोकसभेवेळी...”

वणव्याने डोंगर झाले ओसाड, वन विभागाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 07, 2018 3:12 AM

मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत.

कामशेत - मावळ तालुक्यातील अनेक डोंगर वणवे लागून ओसाड झाले आहेत. मात्र एकही डोंगरावर लागलेला वणवा विझविण्यास वन विभागास जमलेले नाही आणि तसे प्रयत्नही वन विभाग करताना दिसत नसल्याची तक्रार अनेक पर्यावरणप्रेमी करीत आहेत.मावळ तालुक्यात नाणे, पवन, आंदर मावळासह अनेक भाग मागील काही वर्षांपूर्वी घनदाट जंगले, वनराई व नैसर्गिक साधनसामग्रीने स्वयंपूर्ण होता. मात्र, बेसुमार वृक्षतोड, जाणीवपूर्वक लावलेले वनवे, डोंगरांवर होणारे उत्खनन आदी कारणांमुळे मावळ तालुका हा नैसर्गिक सौंदर्याने नटलेला तालुका म्हणून ओळख असताना ती कालांतराने हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. एकेकाळी धो धो पडणारा पाऊसही आता मोजूनमापून पडत आहे. मावळातील विविध भागांत जाताना गर्द झाडी असायची. आता मात्र सावली मिळण्यासाठी एखादे झाडही मिळणे मुश्कील झाले आहे. याची कारणे शोधण्यात व त्यावर उपाययोजना करण्यात प्रशासनाला वेळ नसला, तरी काही वर्षांपासून अनेक पर्यावरणप्रेमी संघटना वृक्षारोपणापासून ते त्यांच्या संवर्धनापर्यंत जबाबदारी उचलताना अनेक ठिकाणी दिसत आहेत.वन विभागाचे अधिकारी फक्त कागदोपत्री काम करीत असल्याने मावळातील वणवेही केवळ कागदांवर शिल्लक राहिले आहेत.मावळातील वनक्षेत्राची दोन विभागांत विभागणी करण्यात आलेली आहे. यामध्ये वडगाव विभागांतर्गत साधारण १० हजार ६६ हेक्टर वनक्षेत्र आहे. यात १२९ गावांचा समावेश आहे. हे वनक्षेत्र सांभाळण्यासाठी एक वनक्षेत्रपाल, १३ वनरक्षक, ३ वनपाल, तर १८ वनमजूर काम करतात. शिरोता विभागात साधारण १२ हजार ६१३ हेक्टर वनक्षेत्र असून, त्याकडे लक्ष देण्यासाठी एक वनक्षेत्रपाल, १४ वनरक्षक, ३ वनपाल व १५ वनमजूर कार्यरत आहेत. एवढे लोक कार्यरत असतानादेखील मावळात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत आहे. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी व वनाचे रक्षण करण्यासाठी नेमलेल्या वनरक्षकांचे खिसे गरम करून, शिवाय वन्य प्राण्यांची शिकार करून त्यांना मेजवानी देऊन त्यांची मर्जी सांभाळल्यास तुम्ही काहीही करू शकता, असे काही वन्य प्राणिप्रेमी व पर्यावरणवादी नागरिक उपहासाने म्हणत आहेत.मागील वर्षी मावळात एक लाख वीस हजार झाडे लावण्यात आली; पण त्यातील किती झाडे जगली याविषयी कोणतीच माहिती उपलब्ध नसावी. कारण शासनाने केवळ वृक्षलागवड केली. मात्र त्यांच्या संगोपनाची काळजी घेतली नाही व या वर्षी साधारणत: साडेतीन ते चार लाख झाडे लावण्यात येणार आहेत. पण त्यांच्याही संगोपनाचे नियोजन केलेले नसल्याने शासन वृक्ष लागवडीसाठी करीत असलेला खर्च हा व्यर्थ जात आहे. वणव्यांमुळे जैवविविधता नष्ट होते हे सांगणाºया वन विभागाचा ढिसाळ कारभारच यासाठी जबाबदार आहे. अपुरी व अद्ययावत नसलेली साधनसामग्री, कामाच्या बाबतीत उदासीनता, त्याचप्रमाणे स्थानिकांचा विचार करण्याचा दृष्टिकोन आदी कारणे काही पर्यावरणप्रेमी सांगतात.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडforestजंगलfireआग