पिंपरी : घर अथवा गृहसंकुल उभारताना वृक्षलागवड करून त्याची पूर्ण वाढ होईपर्यंत महापालिकेकडे ठेवावी लागणारी वृक्ष संवर्धन नागरी अनामत रक्कम (डिपॉझिट) महापालिकेकडे कोट्यवधींनी पडून आहे. ही रक्कम परत नेणाºयांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे मागील पाच वर्षांत महापालिकेकडे १६ कोटींची रक्कम जमा असून, यातील केवळ २८ लाख इतकीच अनामत रक्कम परत नेली आहे. यावरून वृक्ष संवर्धनाविषयी बांधकाम व्यावसायिक तसेच गृहनिर्माण सोसायट्यांची अनास्था दिसून येतेबांधकाम करीत असताना झाडे लावणे बंधनकारक आहे. यामध्ये एका गुंठ्यात एक झाड लावावे लागते यासाठी महापालिकेकडे दोन हजार रुपये अनामत रक्कम म्हणून ठेवावी लागते. यातून महापालिकेच्या कोषागारात गेल्या पाच वर्षांत १६ कोटी रुपये जमा झाले आहेत. त्यामुळे रक्कम जमा करणारे पुन्हा रक्कम घेऊन जात नसल्याचेही समोर आले आहे. एकतर झाडच लावले जात नाही अथवा मोठ्या गृहप्रकल्पाचे बांधकाम व्यावसायिक अनामत रक्कम नेण्यासाठी अर्जच करीत नाहीत. त्यामुळे ही रक्कम पडून राहते.बांधकाम परवानगी घेत असतानाच झाडे लावण्यासाठीची अनामत रक्कम जमा करावी लागते. त्या झाडाचा बुंधा २५ सेंटीमीटरचा झाल्यानंतर त्याची पाहणी करून ही अनामत रक्कम परत केली जाते. झाड लावून रक्कम नेण्यासाठी पाच वर्षांची मुदत दिली जाते. या मुदतीत अनामत रकमेसाठी मागणी अर्ज न नेल्यास रक्कम जप्त केली जाते.अनामत रक्कम परत नेणाºयांमध्ये छोट्या भूधारकांचे प्रमाण अधिक आहे. गृहसंकुल उभारणारे बहुतेक बांधकाम व्यावसायिक अनामत रक्कम परत नेण्यासाठी अर्जच करीत नाहीत. तर छोटे भूधारक झाड लावतानाच मोठ्या बुंध्याचे लावतात. त्यामुळे अनामत रक्कमही लवकर परत मिळते.२०१३-१४ या आर्थिक वर्षात तर ४ कोटी ८७ लाखांपैकी अवघी ३ हजार ५०० रुपये इतकीच अनामत रक्कम परत नेण्यात आली.
वृक्ष संवर्धनाविषयी अनास्था
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2017 4:31 AM