लोकमत न्यूज नेटवर्कपिंपरी : व्हेरॉक चषक १२ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर अॅकॅडमी ‘अ’ संघाने पीवायसी संघाचा ७३ धावांनी पराभव करीत विजेतेपद पटकावले.थेरगाव येथील अॅकॅडमीच्या मैदानावरील अंतिम सामन्यात व्हेरॉक-वेंगसरकर अॅकॅदमीने प्रथम फलंदाजी करताना २५ षटकात ४ बाद १७० धावा केल्या. त्यांच्या ओकार राजपूतने नाबाद ७९ धावा करीत धावसंख्येस आकार दिला. सामनावीर ठरलेल्या ओकांरला अथर्व देशपांडे (नाबाद ३३) आणि भार्गव महाजन (२८) यांनी उत्तम साथ दिली. पीवायसीचा डाव २२.१ षटकात ९७ धावांत आटोपला. त्यांच्या पुरब उपाध्यायने सर्वाधिक २० धावा केल्या. व्हेरॉकच्या प्रसन्न पवारने तीन तर साहील सावंत, ओम पोकळे यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. त्यापूर्वी सकाळच्या सत्रात पहिल्या उपांत्य सामन्यात पीसीएमसीज व्हेरॉक वेंगसरकर अकॅडमी ‘अ’ संघाने आपल्याच ‘ब’ संघावर १०९ धावांनी सहज विजय मिळविला. ८७ धावा करणारा ओंकार राजपूत सामनावीर ठरला. दुसऱ्या उपांत्य सामन्यात पीवायसीने जसक्रिकेट अकॅडमीवर ९ गडी राखून विजय मिळविला. सुफीयानं सय्यद सामनावीर ठरला. मालिकावीर पुरस्कार ओंकार राजपुतने मिळविला. उत्कृष्ट फलंदाज प्रसन्ना पवार आणि उत्कृष्ट गोलंदाज अक्षत जैन ठरला. पारितोषिक वितरण कार्यकारी अभियंता (स्थापत्य) प्रदीप पुजारी आणि शशी काटे स्पोर्ट्स फाउंडेशनचे अध्यक्ष शशी काटे यांचे हस्ते झाले. या प्रसंगी सर्व प्रशिक्षक उपस्थित होते.
वेंगसरकर अॅकॅडमी ‘अ’ विजेता
By admin | Published: May 09, 2017 3:44 AM