शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: वर्चस्वाच्या लढाईत मुंबईवर कोणाचे राज्य?; महामुंबईतील लढतींचा लक्ष्यवेध 
2
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; डोक्याला गंभीर दुखापत
3
नेत्यांच्या प्रचारतोफा थंडावल्या, आता उद्या मतदारांची तोफ चालणार
4
लुटारू आणि सर्वसामान्य जनता यांच्यातील लढाई; राहुल गांधी यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्ला
5
आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनीवर चाकूहल्ला; तर जळगावात उमेदवारावर गोळीबार
6
तिकडे ते गोड, इकडे नावडते असे का?, राहुल गांधी यांना विनोद तावडेंचा सवाल; काँग्रेस नेते-अदानींचे दाखवले फोटो
7
...मग सत्ताधारी कोणासाठी राज्य चालवतात?; शरद पवार यांचा सवाल
8
Maharashtra Election 2024: पैशांचा बाजार! २०१९च्या तुलनेत पाचपट रक्कम जप्त
9
काँग्रेसची आश्वासने  निवडणुकीपुरतीच; देवेंद्र फडणवीस यांचा सोयाबीन भावावरून पलटवार
10
आपला उमेदवार १ नंबर, यादीत नाव १ नंबर, लीड १ नंबर लागली पाहिजे; रितेश देशमुखचा लय भारी प्रचार
11
“काँग्रेसचे कायम कुटुंबाला प्राधान्य, पण आमच्यासाठी राष्ट्र प्रथम”; CM मोहन यादव यांची टीका
12
'लोकशाहीचे धिंडवडे...', अनिल देशमुखांवरील हल्ल्याचा शरद पवार गटाकडून निषेध
13
“विश्वजित कदम यांच्यात मुख्यमंत्री होण्याची क्षमता, दीड लाखांहून अधिक मतांनी विजयी होतील”
14
2 तास पाठलाग अन् पाकिस्तानी जहाजावरून भारतीय मच्छिमारांची सुटका! इंडियन कोस्ट गार्डनं दाखवला दम
15
“अजितवर अन्याय, तो काय सोसतोय हे मला माहिती आहे”; आई आशाताई पवारांचा पत्राद्वारे संवाद
16
यंदा बारामती अंडरकरंट! दोन्ही पवारांच्या सभांना तोबा गर्दी, कोणालाच थांगपत्ता लागेना...
17
“...तर उद्या सकाळी निवडणुकीतून माघार घेईन”; दिलीप वळसे पाटलांचे खुले आव्हान
18
प्रचारसभेहून परतत असताना वाहनावर दगडफेक; अनिल देशमुख जखमी, उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
19
'ही राष्ट्रीय आणीबाणी', मुख्यमंत्री आतिशी यांनी दिल्लीतील प्रदूषणाचे खापर केंद्रावर फोडले
20
हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

पीएमपी बसमध्ये अंधश्रद्धेला खतपाणी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2019 11:56 PM

प्रशासनाचे दुर्लक्ष : फुकटच्या जाहिरातींमुळे विद्रूपीकरण, कारवाई करण्याची प्रवाशांनी केली मागणी

शीतल मुंडे

पिंपरी : पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील मुख्य सार्वजनिक वाहतूक व्यवस्था म्हणून पुणे महानगर परिवहन महामंडळाकडे (पीएमपी) पाहिले जाते. शहरातील शेकडो मार्गांवरून बसच्या फेऱ्या होतात. दररोज हजारो प्रवासी पीएमपीने प्रवास करतात. या बस स्वच्छ असणे अपेक्षित आहे. मात्र, डेपोतून स्वच्छ होऊन निघालेल्या बसचे काही जणांकडून विद्रूपीकरण होत आहे.

जाहिरातबाजी, काही प्रवाशांच्या थुंकण्यासारख्या गलिच्छ सवयी यांमुळे हा प्रकार होत आहे. करणी, बुवाबाजी, काही अशास्त्रीय इलाजाचे दावे करणाऱ्या जाहिरातींचे बेकायदापणे चिकटविलेले स्टिकर यांचा या विद्रूपीकरणात मोठा हातभार आहे. विद्रूपीकरणासह अंधश्रद्धेलाही यातून खतपाणी घालण्यात येत असले, तरी यावर प्रवासी, अधिकारी-कर्मचाऱ्यांसह पदाधिकाºयांचाही अंकुश नसल्याने त्यामध्ये वाढ होत आहे. प्रवाशांना सहज वाचता येईल किंवा दिसून येईल, अशा पद्धतीने या जाहिराती चिकटविण्यात येतात.आजाराबाबतही चुकीची जाहिरातबाजी४मन चाहा प्यार, सौतन से छुटकारा, वशीकरण बाबा-बुवांचे बोल, घरबसल्या ए टू झेड समस्यांवर खात्रीशीर उपाय, विविध रोगांवर रामबाण औषध, विवाह संस्था, घरी बसून ३० हजार रुपये कमवा, दारू सोडवा, गुंठेवारी, जागा खरेदी-विक्री, करणी करणे, प्रेमविवाह अशा विविध प्रकारच्या जाहिराती चिकटविण्यात येतात. झेरॉक्स चिकटवून वा विविध आकारांतील स्टिकरचा त्यासाठी वापर करण्यात येतो.जाहिराती चिकटविणाºयांचा शोध घेणे आवश्यक४बसमध्ये जाहिरात चिकटविणाºयांचा शोध घेणे आवश्यक आहे. जाहिरातीमध्ये संपर्कासाठी मोबाइल क्रमांक दिला जातो. त्यामुळे जाहिरातदारांचा किंवा जाहिराती चिकटविणाºयांचा शोध घेणे सहजशक्य आहे. मात्र त्यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. अशा प्रकारे जाहिरातबाजी करून बसचे विद्रूपीकरण करणाºयांवर कारवाईची अपेक्षा प्रवाशांकडून व्यक्त होत आहे.कारवाई करण्यात प्रशासन अपयशी४बसमधील काही जाहिराती आक्षेपार्ह असतात. अशा प्रकारांकडे पीएमपी प्रशासन दुर्लक्ष करीत आहे. त्याचा त्रास प्रवाशांना सहन करावा लागत आहे. तसेच बसच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. पीएमपीच्या ताफ्यात नव्याने दाखल होणाºया तेजस्विनी बस, ई-बस यांमध्येही असे विद्रूपीकरण सर्रास दिसून येते.प्रत्येक बसमध्ये या जाहिराती बघायला मिळतात. जमीन खरेदी-विक्रीसह विविध प्रकारच्या जाहिराती लावण्यात येतात. जाहिरातींमध्ये संबंधित व्यक्तींचा संपर्क क्रमांकही नमूद करण्यात आलेला असतो. त्यामुळे त्यांना त्वरित आणि चांगला प्रतिसाद मिळत असावा. त्यामुळे या जाहिरातींचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाचे मोठ्याप्रमाणात नुकसान होत आहे. फुकट जाहिरातीमुळे बसचे विद्रुपीकरण मोठ्याप्रमाणात होत असल्याचे दिसत आहे. - संतोष शिंदे, प्रवासीपीएमपीचा थांबा आणि बसमध्येही जाहिराती चिकटविण्यात येतात. फुकटात जाहिरातबाजी करण्यात येत आहे. त्यामुळे पीएमपी बससह थांब्यांचेही विद्रूपीकरण होत आहे. अशा जाहिराती हटविणे आवश्यक आहे. मात्र तसे होताना दिसत नाही. प्रशासनाने याबाबत यंत्रणा कार्यान्वित करून अशा जाहिरातींना आळा घातला पाहिजे.- स्वप्निल देशपांडे, प्रवासीपीएमपी बसमध्ये प्रवास करीत असताना वशीकरण करणे, संतानप्राप्ती अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जाहिराती लावण्यात येतात. प्रवाशांचे लक्ष वेधले जाईल अशा पद्धतीने जाहिराती चिकटविल्या जातात. एखाद्या व्यक्तीवर करणी कशी करावी किंवा कशा पद्धतीने वशीकरण करावे, याबाबत संपर्काचे आवाहन करणारा मजकूर या जाहिरातींमध्ये असतो.- स्रेहा सोनवणे, प्रवासी

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडBus Driverबसचालक