पिंपरी, दि. 6 : मोशी, प्राधिकरण येथील आरटीओ कार्यालयाच्या मागील मोकळ्या जागेत महिलेच्या केसाला धरून एकजण तिला फरफरटत नेत होता. शिवीगाळ करीत तिला मारहाण करू लागला. चाकूने तिच्यावर वार करू लागला. त्या ठिकाणी असलेल्या लोकांना शनिवारी भरदिवसा दुपारी साडेचारच्या सुमारास हा थरार पहावयास मिळाला. हातातील धारदार चाकुने तो तिच्यावर वार करू लागताच, जमाव पुढे आला, त्यांनी त्या गृहस्थास पकडले. पोलिसही त्या ठिकाणी वेळीच दाखल झाले. त्यांनी हल्लेखोरास ताब्यात घेतले. तो हल्लेखोर दुसरा, तिसरा कोणी नसून तिचा पती असल्याचे महिलेने दाखल केलेल्या तक्रारीवरून स्पष्ट झाले. कायद्याचा, पोलिसांचा धाक उरला नसल्याने भरदिवसा असे हल्याचे प्रकार घडू लागल्याच्या संतप्त प्रतिक्रिया नागरिकांनी नोंदविल्या.पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारी घटनांमध्ये वाढ होत आहे. खुलेआम शस्त्र घेऊन वावरण्यापर्यंतची आरोपी मजल मारतात, हे पोलिसांचा वचक नसल्याचे जवलंत उदाहरण असल्याचे नागरिक बोलू लागले आहेत. ज्या महिलेवर चाकू हल्ला झाला. त्या महिलेचे नाव फरहाना फिरोज शेख (वय २६,रा.वास्तुउद्योग कॉलनी, पिंपरी) असे आहे. तर हल्ला करणाºया आरोपीचे नाव फिरोज अली शेख (वय ३०) असे आहे. या हल्यात तिच्या चेहºयावर आणि पोटावर जखमा झाल्या आहेत.
VIDEO - भोसरीत नवऱ्याने तिला धरले चाकूच्या धारेवर, बघ्यांच्या गर्दीने केली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2017 4:47 PM